पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा सहावा दिवस आहे. या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कोल्हापुरातून जवळपास तब्बल दहा हजारांहून लोक या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झाले आहेत. कोल्हापूरच्या या लोकांनी अनोखे पद्धतीने स्वागत करत सहभागी झाले आहेत. या लोकांनी कोल्हापुरी फेटे घातले होते. या यात्रेत चक्क कुस्तीचा फड रंगला होता. वाचा सविस्तर बातमी.
गेले काही दिवस भारतभर चालत असणाऱ्या कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रातील आजचा सहावा दिवस आहे. या यात्रेला कोल्हापूरहून १० हजारांहून अधिक लोक सहभागी झाले आहेत. कोल्हापुर म्हटलं की वेगळेपण आलचं. या कोल्हापूरकरांनी राहुल गांधीच स्वागतही अगदी कोल्हापुरी पद्धतीने कळमनुरीत (Kalamnuri) केले आहे. या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या कोल्हापूरकरांनी कोल्हापुरी फेटे घातले होते, मर्दानी खेळाचे प्रदर्शन केले आणि यात्रेतचं चक्क कुस्तीचा फड रंगला.
राहुल गांधी यांनी सुरक्षा ताफ्यातून बाहेर येऊन कोल्हापुरी कुस्तीचे प्रात्यक्षिक पाहिले. कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी या कुस्त्याचे आयोजन केले होते. हा कुस्तीचा फड सकाळी सहा वाजताच रंगला होता. महाराष्ट्रातून या भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विवीध पक्षातील नेत्यांसह, कार्यकर्ते, सर्वसामान्य लोक सहभागी होत आहेत.
माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, "छत्रपती शाहू महाराज या कर्तृत्वान राजाची पुरोगामी राजा म्हणून ओळख होती. त्यांनी समतेचा विचार दिला. तोच विचार पुढे घेऊन राहुल गांधी यांनी ही यात्रा काढली आहे. त्यामुळे आम्ही दहा हजार कोल्हापूरकर या यात्रेत सहभागी झालो आहोत."