Latest

Priyanka Chopra : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ पतीसाठी झाली ‘चिअर गर्ल’!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला (Priyanka Chopra) नेहमी तिच्या स्टाईलमुळे आणि फोटोंनी सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या ती वेगळाच कारणांने चर्चेत आली आहे. नुकतेच प्रियांका पती निक जोनासला चिअरअप करण्यास 'चिअर गर्ल' म्‍हणून मैदानात उतरली.

प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) नुकतेच लॉस अन्जेलीस कॅलिफोर्निया येथील बेसबॉल खेळाच्या मैदानातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत प्रियांका पती निक जोनासला वॉर्डरोबमधून चिअरअप करताना दिसत आहे. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचे जॅकेट, क्रॉप टॉप आणि लाल रंगाची पँन्ट घातली आहे.  निक पांढऱ्या रंगाच्या कपड्यात बेसबॉल खेळताना दिसत आहे. या कपलने यावेळी बेसबॉल खेळाचा मननुराद आनंद लुटला.

याच दरम्यान प्रियांने एका चिमुरडीसमोर डान्सदेखील केला. यातील एका फोटोत बेसबॉल खेळातील ११ प्लेअर्स एकसाथ दिसत आहेत. यातील खास म्हणजे, प्रियांका खेळपट्टीच्या बाजूला उभी राहून चिअरअप करताना दिसली. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'खेळाचा दिवस ❤️?'. असे म्हटले आहे. याशिवाय तिच्या एका फोटोत तिच्या बाजूला आकर्षक आणि सुंदर खेळाचे मैदान दिसत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्संनी कॉमेन्टचा पाऊस पडत आहेत. या फोटोवर निकने फायरचा ईमोजी शेअर केला आहे. याच दरम्यान एका चाहत्याने 'Woof woof ??', 'Omg???????'.असे लिहिले आहे. याशिवाय काही चाहत्यांनी भरभरून कौतुक करताना हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

आधी अनुष्‍का आता प्रियांका

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटर विराट कोहलीला चिअरअप करण्यासाठी खेळाच्या मैदानात उतरत असते. तर सध्या तोच फार्मुला वापरत प्रियांका देखील बेसबॉल मैदानात उतरली आहे. याआधी प्रियांका 'ऑस्कर पुरस्कार' सोहळ्यात ब्लॅक रंगाच्या साडीत आकर्षक दिसत होती. यावेळचे फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला होता. याशिवाय तिचे अनेक हॉट फोटोज सोशल मीडियावर पाहायलवा मिळतात. प्रियांका 'एन्डिंग थिंग्ज', 'टेक्स्ट फॉर यू' आणि 'सिटाडेल' या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT