Police Suspension Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Toxic Liquor Case Police Suspension: विषारी दारू प्रकरणात 4 पोलीस निलंबित

हातभट्टी किंगशी संपर्क उघड झाल्याने कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात विषारी दारूपुरवठ्यात सहभागी असलेल्या हातभट्टी किंग राजू प्रजापतीशी आर्थिक तसेच वैयक्तिक संपर्क असल्याचे उघड झाल्याने उरुळी कांचन व यवत या पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

याबाबतचा आदेश ग््राामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल्ल यांनी दिला आहे. अजित शिवाजी काळे, सुमीत नंदकुमार वाघ (उरुळी कांचन), रामदास ज्ञानदेव जगताप, सुभाष बलभीम डोईफोडे (यवत) अशी त्यांची नावे आहेत.

दै. ‌‘पुढारी‌’तून दारूपुरवठ्याची साखळी उजेडात आणल्यानंतर या चार कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात आली. त्यानंतर या चौघांचे निलंबन करण्यात आले. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात विषारी दारूने 20 हून अधिक जणांचा बळी घेतल्यानंतर हातभट्टी दारूच्या पुरवठ्यात उरुळी कांचन येथील राजू प्रजापती याचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले.

त्यानंतर पुणे ग््राामीण पोलीस अधीक्षक गिल्ल यांनी अपर पोलीस अधिकारी बारामती विभाग यांच्यामार्फत संबंधित कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी केली. यात उरुळी कांचन व यवत पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांचा दारू विक्रेत्यांशी संपर्क असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.

कारवाई जुजबी

विषारी दारूकांडामुळे झालेल्या मृत्यूबद्दल पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या तुलनेत ग््राामीण पोलिसांची कारवाई फारच जुजबी असल्याची चर्चा आहे. राजू प्रजापती हा फक्त मोहरा असून यातील मुख्य साखळी कारवाईपासून दूर असल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT