FYJC Admission 2026: लोणावळ्यात अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ; सर्व्हर डाऊन व तांत्रिक त्रुटींमुळे विद्यार्थी-पालक हैराण

कॅप राऊंडमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची नावेच गायब; ऑफलाईन प्रक्रियेची मागणी जोरात
Admission
AdmissionPudhari
Published on
Updated on

लोणावळा: यावर्षीपासून कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला खरा, मात्र या प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी आणि ढिसाळ नियोजनामुळे सध्या विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड गोंधळ, भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑनलाईन अर्ज पूर्ण भरूनही तो अपूर्ण दाखवत असल्याने पहिल्या ‌‘कॅप‌’ (उअझ) राऊंडमध्ये अनेक गुणवंत विद्यार्थ्यांची नावेच आलेली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Admission
Ahilyadevi Holkar Jayanti: पिंपरी-चिंचवडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात; ‘पुण्यश्लोक’ महानाट्याला प्रचंड प्रतिसाद

सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक अडचणींचा विळखा

एकीकडे ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडथळे येत असतानाच, दुसरीकडे शिक्षण विभागाचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. यामुळे महाविद्यालयांची निवड करण्यापासून ते आवश्यक कागदपत्रे (डॉक्युमेंट्‌‍स) अपलोड करण्यापर्यंत पालकांना तासनतास संगणकासमोर बसावे लागत आहे. त्यातच एकदा अर्ज मफलॉकफफ केला की, त्यात तातडीने दुरुस्ती करण्याचा कोणताही पर्याय सध्या उपलब्ध नाही. अर्जात काही चूक झाली असल्यास किंवा माहिती अपूर्ण राहिली असल्यास त्यात बदल करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील फेरीची किंवा शिक्षण विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

Admission
Pimpri Census Survey Issues: पिंपरी-चिंचवडमध्ये जनगणना कामावर शिक्षक नाराज; निकृष्ट साहित्य व तांत्रिक अडचणींचा फटका

थेट प्रवेशाची सोपी पद्धत बंद झाल्याचा फटका

पूर्वी अकरावीची प्रवेशप्रक्रिया ही थेट महाविद्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने पार पडत असे. ती अत्यंत सोपी, सुटसुटीत आणि सोयीस्कर होती. महाविद्यालयात जागेवरच शंकांचे निरसन होत असे. मात्र, शासनाने ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन केल्यामुळे सर्वच स्तरावर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

विद्यार्थी व पालकांची प्रमुख मागणी

  • अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईनऐवजी तात्पुरती ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात यावी.

  • ऑनलाईन पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर करून अर्जात दुरुस्ती (एवळीं) करण्याचा थेट पर्याय उपलब्ध करून द्यावा.

  • स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालयांना प्रवेशप्रक्रियेचे विशेष अधिकार बहाल करण्यात यावेत.

Admission
Pimpri Drain Cleaning: पिंपरी-चिंचवडमध्ये नालेसफाई 92.33 टक्के पूर्ण; पावसाळ्यापूर्वी तयारी अंतिम टप्प्यात

निकालापूर्वीपासूनच प्रक्रियेला सुरुवात, तरीही गोंधळ कायम

यंदा दहावीचा निकाल लागण्यापूर्वीपासूनच शिक्षण विभागाने ऑनलाईन नोंदणी सुरू केली होती. निकाल लागण्यापूर्वी अर्जाचा ‌‘भाग 1‌’ भरून घेण्यात आला, तर निकाल जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवण्यासाठी मभाग 2फ भरून अर्ज लॉक करण्यात आले. मात्र, अर्जातील सर्व माहिती आणि आवश्यक ते सर्व रकाने अचूक भरूनही संगणकीय प्रणालीवर (पोर्टल) अर्ज मअपूर्णफ (खपलेाश्रिशींश) दाखवले जात आहेत. ऑनलाईन अर्ज नेमका कसा पूर्ण करायचा, याबाबत कोणतीही स्पष्ट नियमावली किंवा मार्गदर्शन नसल्याने पालक व विद्यार्थी पुरते गोंधळून गेले आहेत.

Admission
Pimpri Drowning Deaths: पिंपरी-चिंचवडमध्ये 5 महिन्यांत बुडून 50 जणांचा मृत्यू; पोलिसांकडून जलसाठ्यांची तपासणी सुरू

जवळच्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याबाबत संभम

आपल्या घराजवळच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा, जेणेकरून प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचेल, अशी बहुतांश पालक व विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी पसंतीक्रमही दिले होते. परंतु, माहिती अपूर्ण दाखवली गेल्याने पहिल्या फेरीत अनेकांची नावेच आलेली नाहीत. परिणामी, हक्काच्या आणि जवळच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार की नाही, या विवंचनेत विद्यार्थी अडकले आहेत. शिक्षण विभाग यावर काय तोडगा काढणार आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

सध्या उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे हवालदील झालेले पालक व विद्यार्थी जवळच्या महाविद्यालयांमध्ये धाव घेत आहेत. मात्र, संपूर्ण यंत्रणा ऑनलाईन असल्याने आणि नियंत्रण शिक्षण विभागाकडे असल्याने महाविद्यालयांकडेही यावर कोणतेही ठोस उत्तर नाही. त्यामुळे महाविद्यालयांच्या आवारातही सध्या संभमावस्था पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news