YCM Hospital Dental X-Ray: वायसीएम रुग्णालयातील दातांची एक्सरे मशीन बंद; रुग्णांची गैरसोय वाढली

गोरगरीब रुग्णांना बाहेरून एक्सरे काढावा लागत असल्याने संताप; नवीन मशीन बसविण्याची मागणी जोरात
Dental X-Ray Machine
Dental X-Ray MachinePudhari
Published on
Updated on

खराळवाडी: यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील दातांचा एक्सरे काढणारी मशीन गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. यामुळे पिंपरी शहरांतील रुग्णांची गैरसोय होत आहे. याबद्दल अनेक रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी वायसीएम रुग्णालयातील प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतरही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही.

Dental X-Ray Machine
Talegaon Lake Tourism: तळेगाव स्टेशन तलाव पर्यटकांचे आकर्षण; कारंजे बंद असल्याने नाराजी, सुविधांची मागणी जोरात

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात केवळ पिंपरी शहरातून नाही, तर तळेगाव, मळवली, वडगाव मावळ, आळंदी, वाघोली अशा इतर ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात गोरगरीब नागरिक उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात आल्यानंतर उपचाराच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधा रुग्णांना मिळणे अपेक्षित असताना रुग्णालयातील दातांची एक्सरे मशीन बंद असल्यामुळे रुग्णांना बाहेर जाऊन तपासणी करावी लागत आहे.

Dental X-Ray Machine
FYJC Admission 2026: लोणावळ्यात अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ; सर्व्हर डाऊन व तांत्रिक त्रुटींमुळे विद्यार्थी-पालक हैराण

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून दातांचा एक्सरे काढणारी मशीन बंद असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. वर्षभरात आतापर्यंत पाच वेळा ही मशीन बंद पडली आहे. वारंवार त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. गेल्या वर्षभरात या मशीनवर किती तरी रुपये दुरस्तीसाठी खर्च करण्यात आल्याची माहिती काही जागरूक नागरिकांपासून मिळाली मात्र, अधिकृतपणे त्यावर कोणीही बोलायला तयार नाही.

Dental X-Ray Machine
Ahilyadevi Holkar Jayanti: पिंपरी-चिंचवडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात; ‘पुण्यश्लोक’ महानाट्याला प्रचंड प्रतिसाद

वायसीएम रुग्णालयात दंतोपचार विभाग आहे. परंतु येथे केवळ दात काढणे अथवा जबड्यावरील मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. परंतु सर्वसामान्य नागरिकांचे दात किडल्यानंतर त्यांना रुटकॅनल करावे लागते; तसेच इतर उपचार घ्यावे लागतात ते येथे मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयात जाऊन पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे वायसीएम रुग्णालयात दंत विभाग आहे, तर सर्व सुविधा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Dental X-Ray Machine
Pimpri Census Survey Issues: पिंपरी-चिंचवडमध्ये जनगणना कामावर शिक्षक नाराज; निकृष्ट साहित्य व तांत्रिक अडचणींचा फटका

नवीन मशीन घ्यावी

पंतप्रधान स्वास्थ्य योजनेंतर्गत केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून नवीन मशीन खरेदी करणे अपेक्षित होते. मात्र, तसे काही झाले नाही. दाताचा एक्सरे काढण्याची मशीन नादुरुस्त असण्याची समस्या वारंवार येत आहे. परंतु महापालिका व वायसीएम प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी प्रशासनाने नवीन मशीन खरेदी करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

मी रुग्णालयात दातांच्या उपचारासाठी गेलो होतो. डॉक्टरांनी सांगितले की, दाताचा एक्सरे बाहेरून काढून आणा. येथे रुग्णालयात ऐक्सरे होत नाही. एवढ्या मोठ्या रुग्णालयात साधी एक्सरेची मशिन नाही. गोरगरीब रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रुग्णालय प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तातडीने दातांची एक्सरे मशीन उपलब्ध करावी.

ईस्माईल पटेल, ज्येष्ठ नागरिक

आता रुग्णांच्या सेवेसाठी एक्सरे मशिन नवीन बसविले आहे. तरी हे मशिन पुढील आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरू होईल. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय दूर करण्यात येईल.

डॉ. राजेश वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय, पिंपरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news