Vegetable Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत दर स्थिर; पालेभाज्यांचे भाव वाढले

उन्हाचा परिणाम; कोथिंबीर, गवार, शेवगा महागले

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 19) बाजारात गेल्या आठवड्याप्रमाणे फळभाज्यांचे दर स्थिर होते. उन्हामुळे पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. उन्हाळ्यामुळे कोथिंबीरची जुडी 30 रुपये दराने विक्री केली जात होती. गवार आणि शेवगा आता 50 - 60 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. वांगी, फ्लॉवर 30 - 40 रुपये किलो दराने होते.

मिरची 60 रुपये, कर्नाटक कैरी बाजारात 50 - 60 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. कांदे 100 रुपयांना 5 किलो विक्री केली जात आहे. लसूण 100 - 150 रुपये, तर आले 60 - 80 रुपये किलो दराने उपलब्ध होते.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो ) पुढीलप्रमाणे :

रविवारी बाजारात गवार 50 रुपये किलो, शेवगा 40, टोमॅटो 25, भेंडी 50, फ्लॉवर 20, कोबी 15, मिरची 50, गाजर 25, शिमला 50, लसूण 100 - 120 रुपये, आले 50, वांगी 30, काकडी 40, कारले 50, कांदे 20 - 25 किलो, बटाटा 25- 30, बिन्स 60, पावटा 70, भोपळा 30 रुपये, घोसाळी 60, दोडका 70, तोंडली 70, बीट 50, दुधी 40, घेवडा 60 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

पिंपरी बाजारातील दर : पालेभाज्यांचे दर (रुपये) प्रतिजुडी

कोथिंबीर 30 रुपये, मेथी 30, पालक 20, शेपू 20, राजगिरा 30, पुदिना 10, मुळा 30, चवळई 20, लाल माठ 15, कांदा पात 20 रूपये, करडई 15, आळू पाने 10 रुपये जुडी, चुका 30 रुपये जुडी विक्री केली जात आहे.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ)

शेवगा 50 रुपये, गवार 60 - 70 रुपये, वाटाणा 120 - 140, पावटा 70, तोंडली 70 रुपये, बीट 60, दोडका 60, कारली 60, भरताची वांगी 50, भेंडी 50 रुपये, मिरची 60, फ्लॉवर 30 - 40, कोबी 15 - 20 , वांगी 50, घोसाळे 60, पडवळ 100, दुधी भोपळा 50, पापडी 60, परवल 80, सुरण 80 रुपये, मद्रास काकडी 40 रुपये, आरबी 50 रुपये किलो, सिमला 50 - 60 रुपये, राजमा 80, बिन्स 70 रुपये, गाजर 50 रुपये किलो, आरवी 70 - 80, रताळी 60 रुपये, टोमॅटो 30 रुपये, काकडी 50 रुपये किलो.

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा 7, बटाटा 10, लसूण 70, आले 30, भेंडी 25, गवार 45, टोमॅटो 8, वाटाणा 75, घेवडा 35, दोडका 25, हिरवी मिरची 35, दुधी भोपळा 30, काकडी 15, कारली 35, गाजर 25, फ्लॉवर 15, कोबी 15, वांगी 20, बीट 0, शेवगा 30, घोसाळी 30, लिंबू 100, शिमला 30, परवल 0, मका कणीस 100 रु. प्रतिकिलो दर होते.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी 4851, पालेभाजी 47800 (गड्डी), फळे आवक 1618, कांदा 641, बटाटा 1255, आले 65, लसूण 21, भेंडी 139, गवार 45, टोमॅटो 800, वाटाणा 20, घेवडा 57, दोडका 36, हिरवी मिरची 178, दुधी भोपळा 25, काकडी 221, कारली 35, डांगर 33, गाजर 146, फ्लॉवर 331, कोबी 258, वांगी 130, ढोबळी 52, बीट 13, शेवगा 86, लिंबू 66, मका कणीस 30, तोंडली 14, रताळी 0 क्विंटल इतकी आवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT