Pimpri Crime: चाकणमध्ये राष्ट्रध्वज जाळल्याप्रकरणी तरुणाला अटक

दिल्लीतील युवकावर गुन्हा; राष्ट्रीय सन्मान कायद्यांतर्गत कारवाई
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

पिंपरी: भारताचा राष्ट्रध्वज जाळल्याप्रकरणी दक्षिण चाकण पोलिसांनी दिल्ली येथील एका तरुणाला अटक केली आहे. ठाकरवस्ती चौक, चाकण येथे बुधवारी (दि. 16) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

Arrested
Pimpri Chinchwad Temperature: पिंपरी-चिंचवडमध्ये 40 अंश तापमान; उकाड्याने नागरिक त्रस्त

असिफ शेख (29, रा. चाकण, मूळ रा. दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात बीएनएस कलम 196 तसेच राष्ट्रीय सन्मान प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रजनीश सीताराम राजभर (31, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजभर यांचे ठाकरवस्ती परिसरात भाजी विक्रीचे दुकान आहे.

Arrested
India Helmet Safety: पिंपरी-चिंचवडमध्ये हेल्मेटकडे दुर्लक्ष जीवघेणे; 209 अपघातांत हेल्मेट नव्हते

आरोपी असिफ हा याच परिसरातील एका चिकन दुकानात पूर्वी काम करत होता. 16 एप्रिल रोजी तो दारूच्या नशेत राजभर यांच्या दुकानाजवळ आला. त्याच्या हातात भारताचा राष्ट्रध्वज होता. त्याने तो ध्वज जाळला व अर्धवट जळालेला ध्वज पायाने कचऱ्याच्या डब्यात टाकला. हा प्रकार पाहताच राजभर यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच दक्षिण चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास दक्षिण चाकण पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news