Vegetables File Photo
पिंपरी चिंचवड

Pimpri Vegetable Market Rates: पितृपंधरवड्यामुळे पिंपरीत भाज्यांचे दर वधारले; गावरान गवार २३० रुपयांवर

लिंबू २००, लसूण २०० तर आले १५० रुपये किलो; मेथी आणि अळूच्या पानांनाही मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. २६) पितृपंधरवड्यामुळे भाज्यांच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. मेथी, कारली, भेंडी, गावरान गवार, लाल भोपळा यांना मागणी असल्याने दर वाढले आहेत. अळूवडीसाठी लागणाऱ्या अळूच्या पानांची जुडी २५ रुपये दराने विक्री केली जात आहे. तर हिरव्या देठाची जुडी ३० ते ४० रुपयांना विक्री केली जात आहे. इतर पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.

लसूण, आल्याचे आणि कांद्याचे दर तेजीतच आहेत. लिंबाची आवक कमी झाल्याने लिंबू २०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. आले १०० ते १५० रुपये किलो, कांदे ५० - ६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. लसूण १८० - २००, तर दुधी भोपळा, काकडी, गाजर आणि कारली २५ रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. टोमॅटो ३० रुपये किलो दर आहे. मेथीची जुडी २५ रुपये दराने विक्री केली जात आहे.

गाजर २५ रुपये, बीट ५०, वाटाणा ८० - ९०, बीन्स ७०, राजमा ८०, वांगी ३०, गवार ७०, शेवगा ८० रुपये, दोडका ८० रुपये, फ्लॉवर ५० रुपये, कोबी २० रुपये, काकडी २५ रुपये, टोमॅटो ३० रुपये, शिमला ३० रुपये, मिरची ४० रुपये, लसूण १८० - २०० रुपये, आले १०० - १५० रुपये, तोंडली ७० - ८० रुपये, बटाटा २५ - ३० रुपये प्रतिकिलो असे दर आहेत.

फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे

रविवारी बाजारात गवार ७० - ८० रुपये किलो, गावरान गवार २०० रूपये किलो, शेवगा ८० रुपये किलो होता. वाटाणा ८० - १०० रुपये, टोमॅटो ३० रूपये, भेंडी ६० - ८० रुपये किलो, फ्लॉवर ५० - ६० रुपये, कोबी २० - ३० रुपये, मिरची ४० - ५० रुपये, गाजर ३० - ४० रुपये, शिमला ३० - ४० रुपये, लसूण १८० - २०० रुपये, आले १५० रुपये, वांगी ४० रुपये, काकडी २५ रुपये, कारले ५० - ६० , कांदे ५० - ६० किलो, बटाटा २५ - ३० रुपये किलो, बिन्स ७० रुपये किलो, पावटा ८०, लाल भोपळा ४० - ५० रुपये, घोसाळी ४०, दोडका ५० - ६० रुपये, तोंडली ७० रुपये, बीट ५० रुपये, दुधी २५, घेवडा ५० - ६० रुपये किलो दर आहे.

पिंपरी बाजारातील दर पालेभाज्यांचे दर (रु.) प्रतिजुडी

कोथिंबीर १५ - २० रुपये, मेथी १५ - २०, पालक १५, शेपू १५, राजगिरा १५, पुदिना १५, मुळा १५, चवळई १५, लाल माठ १५, हिरवा माठ १५, करडई १५, कांदापात १५, करडई १५, आळू पाने २० रुपये जुडी, आंबट चुका १५, हिरवे देठ भाजी ३० - ३० रुपये जुडी.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा १०० रुपये, गावरान गवार २०० - २३० रुपये किलो, गवार ८० रुपये, पावटा ७०, तोंडली ७० रुपये, बीट ५० , दोडका ७०, कारली ६० - ७०, भरताची वांगी ५०, भेंडी ८० रुपये, मिरची ५०, फ्लॉवर ६०, कोबी ३०, वांगी ५०, घोसाळे ५०, पडवळ ५०, दुधी भोपळा ३० - ३५ , पापडी ९०, पावटा ८०, परवल ८०, सुरण ९० रुपये, मद्रास काकडी ३०- ३५ रुपये, आरबी 80 रुपये किलो, सिमला ४० रुपये, राजमा ८०, बिन्स ८०, गाजर ३० - ३५ रुपये किलो, आरवी ८०, रताळी ७० रुपये, टोमॅटो ३० रुपये .

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा ३५, बटाटा १०, लसूण ११०, आले ७५ , भेंडी २५, गवार ४५, टोमॅटो १५, वाटाणा ७५, घेवडा ६०, दोडका ४५, हिरवी मिरची ३५, दुधी भोपळा २५, काकडी १५, कारली ४०, गाजर २५, फ्लॉवर २०, कोबी १०, ढोबळी ३५, वांगी ३०, शेवगा ४५, घोसाळी ३०, लिंबू १००, मका कणीस ८० रुपये प्रतिकिलो दर होते.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी ५९६४, पालेभाजी ५८३०० (गड्डी), फळे आवक ८११, कांदा ८५३, बटाटा १२६०, लसूण २०, आले ८९, भेंडी १८२, गवार २७, टोमॅटो ८४४, वाटाणा ३१, घेवडा ५७, दोडका ६६, हिरवी मिरची १७६, दुधी भोपळा ७७, काकडी ३४३, कारली ९५, डांगर १६१, गाजर १०६, फ्लॉवर ३८४, कोबी ३९२, वांगी २१८, ढोबळी ११०, बीट ९, शेवगा ५३, लिंबू ५९, मका कणीस ९७, तोंडली ९ इतकी आवक झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT