Pimpri Chinchwad FDA Inspection: पिंपरी-चिंचवडमध्ये मिठाईवर ‘एफडीए’ची करडी नजर; ९२६ किलो खाद्यपदार्थ जप्त

गणेशोत्सवात ४५ ठिकाणी तपासणी; भेसळप्रकरणी ४ लाख ६२ हजार ६८३ रुपयांचा दंड वसूल
FDA Action
FDA ActionPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर मिठाईला मोठी मागणी होती; मात्र भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाकडून पिंपरी-चिंचवड शहरात १ ते २४ सप्टेंबरदरम्यान दुकाने व मिठाई विक्रीच्या ४५ ठिकाणी पदार्थांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ९२६ किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. त्यानुसार संबंधितांकडून ४ लाख ६२ हजार ६८३ दंडाची रक्कम वसुल करण्यात आली.

FDA Action
Pimpri Chinchwad DJ Sound Pollution: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘डीजे’ शांत; ‘बापट इफेक्ट’ की ‘चौबे पॅटर्न’?

गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक, पेढे, काजू, कतली, मोतीचूर, लाडू, बुंदी, जिलेबी, रसगुल्ला आदी मिठाई पदार्थांना विशेष मागणी असते. या दरम्यान काही मिठाई विक्रेत्यांकडून भेसळयुक्त पदार्थ विक्री केले जातात. या गोष्टीला प्रतिबंध करण्यासाठी एफडीएकडून दूध, पनीर, खवा, तूप इत्यादी पदार्थांची तपासणी करण्यात आली. एफडीएकडून पदार्थांची तपासणी होत असल्याने शहरातील मिठाई दुकानांत सुधारणा पहायला मिळाली.

FDA Action
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर तीन वाहनांची धडक; चालकाचा मृत्यू, दोघे जखमी

कर्मचाऱ्यांकडून मिठाई हाताळताना हातमोजे आणि डोक्यावर टोपीचा वापर केला जात होता. मिठाई तयार करण्याची जागा, काऊंटर आणि पदार्थ साठवूणक व्यवस्था स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जात आहे. मिठाई उघडयावर राहणार नाही याची खबरदारी घेतली जात असून ट्रेनमध्ये ठेवलेल्या मिठाईवर ती किती काळ खाण्यास योग्य आहे. याची माहिती देण्याकडेही दुकानदाराचा कल दिसून आला.

FDA Action
Gold Loan Officer Embezzlement: गोल्ड लोन ऑफिसरने ग्राहकांची ३५.७७ लाखांची रोकड हडपली

महाप्रसादावरही एफडीएची नजर

मिठाईच्या दुकानांसोबत गणेश मंडळाकडून महाप्रसाद आणि सामुहिक अन्नवाटपाच्या कार्यक्रमावर देखील अन्न व औषध प्रशासनाची एफडीएची नजर होती. तसेच महाप्रसाद बनविण्याची ऑर्डर घेण्यापूर्वी संबंधित परवानाधारक केटरर्सनी एफडीचा आधिकृत पुर्वनियोजन नमुना संबंधित झोनच्या आधिकाऱ्याकडे सादर केले आहेत. मिठाई चालकांनी देखील स्वच्छतेबाबात नियमांचे पालन करावे असे आवाहन केले होते. अथवा योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले होते.

FDA Action
Pune Metro Ganesh Festival: गणेशोत्सवात पुणे मेट्रोचा विक्रम; ४४ लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

गणेशोत्सवात पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये संशयित ठिकाणी तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत अन्नपदार्थांत भेसळ आढळून आल्याने संबंधितांकडून ४ लाख ६२ हजार ६८३ एवढी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.

संजय चट्टे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news