Gold Loan Officer Embezzlement: गोल्ड लोन ऑफिसरने ग्राहकांची ३५.७७ लाखांची रोकड हडपली

कर्जखाती बंद करण्यासाठी दिलेली रक्कम कंपनीत जमा केली नाही; भोसरीतील उन्नती फिनसर्वमधील प्रकार
Money
MoneyPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: ग्राहकांनी कर्ज खाती बंद करण्यासाठी दिलेली तब्बल ३५ लाख ७७ हजार १३५ रुपयांची रोकड कंपनीत जमा न करता गोल्ड लोन ऑफिसरने हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मे २०२३ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भोसरी येथील उन्नती फिनसर्व प्रा. लि.च्या शाखेत घडला.

Money
Pune Metro Ganesh Festival: गणेशोत्सवात पुणे मेट्रोचा विक्रम; ४४ लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

सुयोग संजय गायकवाड (३०, रा. कामोठे, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अक्षय धर्मराज महामुलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा फायनान्स कंपनीत गोल्ड लोन ऑफिसर म्हणून काम करत होता. ग्राहकांनी त्यांची कर्ज खाती बंद करण्यासाठी दिलेली रक्कम कंपनीत जमा करणे आवश्यक होते. मात्र, आरोपीने ती रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरली. यात कंपनीचे ३५ लाख ७७ हजार १३५ रुपयांचे नुकसान झाले.

Money
Pimpri Chinchwad DJ Free Ganesh Visarjan: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘डीजे’मुक्त गणेश विसर्जन; ९१ गुन्हे, ८६ साऊंडसह वाहने जप्त

जुन्या वादातून ज्येष्ठ महिलेसह दोघांना पाइपने मारहाण

जुन्या वादातून घराबाहेर थांबलेल्या ७० वर्षीय महिलेला लोखंडी पाइपने मारहाण करण्यात आली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तिच्या दोन मुलांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २३) रात्री नऊच्या सुमारास चाकण येथील मार्केटयार्डजवळ घडली.

Money
Pimpri Chinchwad Police Employee: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

याप्रकरणी ७० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुजित देवरे, रुद्र परदेशी, आदित्य धनवटे आणि त्यांचा एक साथीदार (सर्व रा. चाकण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला घराबाहेर थांबली असताना आरोपी तेथे आले. जुन्या वादातून सुजित देवरे याने महिलेला लोखंडी पाइपने मारहाण केली, तर इतर आरोपींनी हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. हा प्रकार पाहून महिलेचे दोन्ही मुलगे भांडण सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Money
Pakistani Beauty Cream: 'मेड इन पाकिस्तान' क्रीमची पिंपरीत विक्री; २३ क्रीम जप्त

'भाजीवाल्याची बाजू का घेता, म्हणत दाम्पत्यावर हल्ला

'तुम्ही भाजीवाल्याची बाजू का घेता,' असा जाब विचारत तिघांनी संगनमताने एका महिलेसह तिच्या पतीला काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २३) रात्री साडेआठच्या सुमारास चाकण येथील मार्केटयार्डजवळ घडली.

याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष बोराटे, संदीप बोराटे आणि एका महिलेविरुद्ध (सर्व रा. पृथ्वीप्रस्थ बिल्डिंग, मार्केटयार्ड, चाकण) गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन 'तुम्ही भाजीवाल्याची बाजू का घेता,' असे म्हणत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news