Drumstick Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Vegetable Market Rates: महाशिवरात्रीमुळे पालेभाज्यांचे दर स्थिर; तर शेवगा कोलमडला

लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत पालेभाज्यांना मागणी नसल्याने दर स्थिर; गवार व शेवग्याचे भाव नरमले, वाटाणा व गाजर ३०–४० रुपये किलो

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. 15) रोजी बाजारात महाशिवरात्रीमुळे पालेभाज्यांना मागणी नसल्याने दर स्थिर होते. वाटाणा गाजर यांचे दर 30 ते 40 रूपये प्रतिकिलो होते. इतके दिवस तेजीत असणाऱ्या गवार आणि शेवगा यांचे दर काहीसे कमी झाले आहेत.

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

गवार 120 रूपये किलो, शेवगा 120, वाटाणा 30, टोमॅटो 25, भेंडी 70, फ्लॉवर 40, कोबी 30, मिरची 60, गाजर 30, शिमला 50, लसूण 180 - 200 रूपये, आले 60 रूपये, वांगी 40, काकडी 30, कारले 60, कांदे 20 - 25 रूपये किलो, बटाटा 25- 30 रूपये किलो, बिन्स 50 रूपये किलो, पावटा 60, लाल भोपळा 30, घोसाळी 60, दोडका 50, तोंडली 90 रूपये, बीट 30, दुधी 50, घेवडा 50 रूपये किलो दराने विक्री केली जात आहे.

पिंपरी बाजारातील दर पाले भाज्यांचे दर (रूपये) प्रति जुडी

कोथिंबीर 25 रूपये, मेथी 25 रूपये, पालक 25 रूपये, शेपू 25 रूपये, राजगिरा 20, पुदिना 10 रूपये, मुळा 25 रूपये, चवळई 20, लाल माठ 20, कांदापात 20 रूपये, करडई 20, आळू पाने 10 रूपये जुडी, चुका 20 रूपये.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (रूपयांत)

शेवगा 140 रूपये, गवार 140 रूपये, पावटा 80, तोंडली 100 रूपये, वाटाणा 40 रूपये, बीट 30, दोडका 80, कारली 80, भरताची वांगी 50, भेंडी 80 रूपये, मिरची 80, फ्लॉवर 50, कोबी 30, वांगी 100, घोसळे 70, पडवळ 90, दुधी भोपळा 50, पापडी 70, परवल 80, सुरण 80 रूपये, मद्रास काकडी 40 रूपये, आरबी 50 रूपये किलो, सिमला 80 रूपये, राजमा 50 काळा, राजमा लाल 50, बिन्स 70 रूपये, गाजर 40 रूपये किलो, आवळा 60 - 70, रताळी 80 रूपये, टोमॅटो 30 रूपये, बिन्स 70 रूपये, काकडी 40 रूपये किलो.

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा 10, बटाटा 9, लसूण 100, आले 50, भेंडी 35, गवार 100, टोमॅटो 15, वाटाणा 40, घेवडा 50, दोडका 50, हिरवी मिरची 80, दुधी भोपळा 25, काकडी 20, कारली 40, गाजर 30, फ्लॉवर 30, कोबी 10, वांगी 30, बीट 25, शेवगा 60, घोसाळी 30, लिंबू 40, शिमला 50, परवल 30, मका कणीस 15 रूपये प्रतिकिलो दर होते.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी 3653, पालेभाजी 42800 (गड्डी), फळे आवक 1180, कांदा 708, बटाटा 856, आले 44, लसूण 47, भेंडी 68, गवार 17, टोमॅटो 335, वाटाणा 186, घेवडा 49, दोडका 20, हिरवी मिरची 217, दुधी भोपळा 66, काकडी 140, कारली 13, डांगर 20, गाजर 156, फ्लॉवर 138, कोबी 126, वांगी 62, ढोबळी 21, बीट 31, शेवगा 27, लिंबू 32, मका कणीस 32, तोंडली 31, रताळी 133 क्विंटल इतकी आवक झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT