Pimpri Chinchwad Subsidized Grain Shops: पिंपरी-चिंचवडमध्ये ७ नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरु; शहरातील दुकाने २६० वर

महिला बचत गटांकडे सोपविलेल्या नवीन धान्य दुकानांमुळे लाभार्थ्यांना घराजवळच सोयीस्कर वाटप; शहरातील स्वस्त धान्य दुकानांची संख्या २५३ वरून २६० वर पोहोचली
Grain
GrainPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात अखेर सात नवी स्वस्त धान्य दुकाने सुरु करण्यात आली आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून या दुकानांतून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष धान्य वाटप सुरु करण्यात आले आहे. त्याबाबतची प्रक्रिया अन्न पुरवठा विभागाने पूर्ण केली आहे. दरम्यान, या सात दुकानांना नजीकच्या दुकानांतील शिधापत्रिकाधारक जोडून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या दुकानांचा कारभार थेट महिला बचत गटांकडे सोपविण्यात आला आहे.

Grain
Pimpri Chinchwad Police Chain Snatching: चेन चोरीच्या घटनांमध्ये घट – सूक्ष्म नियोजन प्रभावी

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत महत्त्वाचा दुवा म्हणून या सात दुकानांचा कारभार हा महिला बचत गटाकडे देण्यात आला आहे. सध्या शहरात महिला बचत गटांकडून 28 स्वस्त धान्य दुकानांची व्यवस्था पाहिली जात आहे. त्यामध्ये आता नव्याने सात दुकानांची भर पडणार आहे. महिला सक्षमीकरणासोबतच रेशन वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. या नवीन दुकानांमुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. घराजवळच स्वस्त धान्य मिळणार असून, लाभार्थ्यांची गैरसोय टळेल, अशी माहिती पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Grain
Pune Vegetable Market Price: कांदा आणि भाजीपाला भाव वाढले – उलाढाल ६.१० कोटी

प्रशासनाकडून प्रक्रिया पूर्ण

या दुकानांची पाहणी करुन तसेच, संबंधित दुकानांच्या मशिनवर धान्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांनी या दुकानांतून धान्य घेण्याबात आवाहन करण्यात आले आहेत. तसेच, काही तक्रार आल्यास त्याची दखल घेतली जाईल. असे अन्न पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Grain
PMRDA New Roads Project: पुणे जिल्ह्यात चार तालुक्यांत पीएमआरडीएकडून १० नवे रस्ते उभारणार

दुकानांची संख्या 260

नवीन सात दुकानांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य दुकानांची संख्या 253 वरुन 260 वर गेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर सर्व दुकानांना आवश्यक ती यंत्रणा व मशीन उपलब्ध करुन देण्यात आल्या अहोत; तसेच मशीनवरच धान्य वाटपाबाबतच्या सूचना तत्काळ देण्यात आल्या आहेत.

Grain
Pimpri Chinchwad Nominated Corporator Race: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार रस्सीखेच

दुकानांची संख्या 260

नवीन सात दुकानांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य दुकानांची संख्या 253 वरुन 260 वर गेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर सर्व दुकानांना आवश्यक ती यंत्रणा व मशीन उपलब्ध करुन देण्यात आल्या अहोत; तसेच मशीनवरच धान्य वाटपाबाबतच्या सूचना तत्काळ देण्यात आल्या आहेत.

...ही आहेत नवीन दुकाने

  • अ परिमंडळ: डांगे चौक, रहाटणी पिंपळे निलख, मामुर्डी

  • ज परिमंडळ: वैभवनगर, दापोडी आणि चिंचवड स्टेशन

नवीन मंजूर सर्व स्वस्त धान्य दुकानांना मशीन देण्यात आली असून, नजीकच्या दुकानांतील लाभार्थ्यांना तेथे जोडण्यात आले आहेत. धान्य वाटप देखील सुरु आहे. या सर्व दुकानांची पाहणी केली आहे.

विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news