PMRDA New Roads Project: पुणे जिल्ह्यात चार तालुक्यांत पीएमआरडीएकडून १० नवे रस्ते उभारणार

हवेली, मावळ, शिरूर आणि खेड तालुक्यांना लाभ; दळणवळण व पर्यटन वाढीस चालना
PMRDA
PMRDA Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत नव्याने दहा रस्ते उभारण्यात येणार आहे. त्यापैकी पिंपरी- चिंचवड शहरालगत असलेल्या हवेली, मावळ, शिरूर आणि खेड तालुक्यात सर्वाधिक रस्ते तयार केले जाणार आहेत. पीएमआरडीएच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या या रस्त्यामुळे नागरीवस्तीमधील दळणवळण वाढीला मदत होणार असून, तालुक्यातील शेतकरी, कामगारांना याचा फायदा होणार असून, पर्यटन वाढीसाठी हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे.

PMRDA
Pimpri Chinchwad Nominated Corporator Race: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार रस्सीखेच

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत नऊ तालुक्यांचे कामकाज चालते. या तालुक्यातील पायाभ्ूात सुविधा उभारण्याचे काम प्राधिकरणातर्फे करण्यात येते. यापूर्वी विविध तालुक्यात रस्ते उभारण्यात आले होते. आता पुन्हा नव्याने दहा रस्त्यांचे नियोजन असून, त्या अनुषंगाने निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. येत्या आठवडाभरात या निविदांवर कार्यवाही सुरु होणार आहे. कार्यआदेश निघाल्यानंतर प्रत्यक्षात काढण्यात येणार आहे.

PMRDA
Pimple Nilakh BRT Road Traffic Issue: पिंपळे निलखमध्ये बीआरटी रोडवर ट्रॅव्हल्स बसमुळे वाहतूक कोंडी

पीएमआरडीएच्या अंतर्गत हवेली, खेड, शिरुर, मावळ आणि पीएमआर अंतर्गत ही कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदाराला साधारण दहा वर्षे देखभाल दुरुस्तीचा जबाबदारी राहणार आहे. या चार तालुक्यातील अंतर्गत तसेच, महत्त्वाची रस्त्याची मोठया प्रमाणात दुरवस्था झाली आहे. नागरीवस्ती, शेतकरी यांना आवश्यक असलेल्या आणखी काही रस्त्याची मागणी देखील स्थानिक पातळीवर करण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक आमदार यांच्या मागणीनुसार या रस्त्याची कामे होणार आहेत.

PMRDA
Sinhagad Express Women Reserved Coach Demand: सिंहगड एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी स्वतंत्र डब्याची मागणी

..असे आहे रस्त्यांचे नियोजन

शिरूर तालुक्यातील सर्वाधिक तीन रस्त्याचे नियोजन असून, तळेगाव ढमढेरे, मझाक कंपनी, पिंपळे जगताप ते करंदी फाटा, सनसवाडी ते पिंपळे जगताप वेळ रिर्व्हर ते तळेगाव ढमढेरे हे रस्ते उभारण्यात येणार आहे. तसेच, मावळ तालुक्यात पुणे-बंगळूर रस्त्यावरील कार्ला फाटा ते मळवली रेल्वे स्थानक, त्याचप्रमाणे कासारसाई ते पुसाणे हे रस्ते प्रस्तावित आहेत. खेड तालुक्यातील म्हाडा हौसिंग सोसायटी म्हाळुंगे या ठिकाणी 18 मीटर रुंदीकरण करण्यात येणार असून, त्याचप्रमाणे इतरही पायाभ्ूात सुविधा उभारण्यात येतील.

PMRDA
Lonavala Lions Point Suicide Incidents: लोणावळ्यातील लायन्स पॉईंटवर वाढत्या आत्महत्यांची छाया; पर्यटनावर परिणामाची भीती

पीएमआरडीएतील विविध रस्ते निर्माणीबाबत निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. लवकरच त्यावर कार्यवाही पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल.

शिवप्रसाद बागडी, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news