Awards Ceremony Pudhari
पिंपरी चिंचवड

Awards Ceremony: पिंपरी-चिंचवड गौरव पुरस्कार सोहळा; दैनिक पुढारीने कर्तृत्ववानांचा सन्मान केला

सामाजिक, शैक्षणिक, उद्योग व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचे पुरस्कार प्रदान; उत्साहात सहभागी नागरिकांनी भरले सभागृह

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: सनईचे सूर...सायंकाळची प्रसन्न वेळ... गर्दीने भरलेले सभागृह ... फेट्यामध्ये मिरवणारे उल्हासी व रुबाबदार पुरस्कारार्थी.. उपस्थितीत मित्रमंडळी, नातेवाईक व वाचकांचा अमाप उत्साह... पुरस्कार प्रदान केल्यानंतर टाळ्यांचा गजर... निमित्त होते दैनिक पुढारी-पिंपरी चिंचवड गौरव सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचे. (Latest Pimpri chinchwad News)

दैनिक पुढारीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‌‘पुढारी‌’ पिंपरी चिंचवड गौरव सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रागा पॅलेस येथे शुक्रवारी (दि.17) झालेल्या या सोहळ्यात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले. व्यासपीठावर खा. श्रीरंग बारणे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, ‌‘पुढारी‌’ चे सरव्यवस्थापक सुनील लोंढे, पिंपरी-चिंचवड आवृत्तीप्रमुख किरण जोशी, वितरण व्यवस्थापक विजय जाधव उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, अमित गोरखे यांनी मनोगत व्यक्त करत दैनिक पुढारीच्या निर्भिड पत्रकारितेचे तसेच, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कारार्थींचे कौतुक करत अभिनंदन केले; तसेच त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

समाजकारण, राजकारण, शिक्षण, उद्योग, व्यवसाय, क्रीडा, शासकीय सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजाविलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील कर्तव्यनिष्ठ व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली. स्मृतिचिन्ह, शाल व तुळशीचे रोप असे पुरस्काराचे स्वरूप होते. ‌‘पुढारी‌’ने गेल्या वर्षी ‌‘पुढारी युवा‌’ पुरस्कार देऊन अनेकांच्या कार्यास दाद दिली होती. यंदा ‌‘पुढारी पिंपरी-चिंचवड गौरव पुरस्कार प्रदान करून विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा गौरव करण्यात आला. पुरस्कार घेऊन छायाचित्र काढण्यासाठी हॉल व परिसरात झुंबड उडाली होती; तसेच मोबाईलवर सेल्फी घेतले जात होते. पुरस्कारार्थींच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता.

सोहळ्यास पुरस्कारार्थी, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि ‌‘पुढारी‌’च्या वाचकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या वेळेपूर्वीचे संपूर्ण हॉल नागरिकांनी खचाखच भरला होता. सनईच्या सुरात कार्यक्रमास सायंकाळी पाचला सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील कर्तृत्ववान, कर्तबगार आणि समाजासाठी मोठे योगदान दिलेल्या मान्यवरांचा दैनिक पुढारीकडून सन्मान करण्यात आला. या कौतुकास्पद उपक्रमांचे यंदाचे दुसरे वर्ष होते. सन्मानित करण्यात येणाऱ्या पुरस्कार्थीचे कर्तृत्व, जीवनकार्य आणि त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची माहिती असलेल्या पुढारी विशेषांकाचे लवकरच प्रकाशन करण्यात येणार आहे. किरण जोशी यांनी प्रास्ताविक केले. विजय जाधव यांनी आभार मानले.

पिंपरी-चिंचवड गौरव पुरस्काराचे मानकरी

अल्पेश वैष्णव, ओंकार भागवत, आदित्य दुर्गाडे, भाग्यश्री लहाने-मुंडे, भरत इंगवले, बापुसाहेब पटांगरे, चंद्रकांत शिंदे, डॉ. दिलीप देशमुख, दिलीप सोनिगरा, दिलीप गुप्ता, दिलीप चोरडिया, धीरज कांबळे, शुभम परदेशी, करिष्मा राजपाल, कविता साळुंखे, मेघराज लोखंडे, मंगेश बारणे, मुकेश चौधरी, मोडाराम चौधरी, मनिषा पानसरे, नितीन इंगोले, नामदेव बच्चे पाटील, रवींद्र तायडे, रविराज साबळे, रोशनी सोनोने, राकेश आमूशेट्टी, सारंग लोखंडे, श्रीकृष्ण फिरके, संदेश नवले, सतीश काळे, संदिप फाकटकर, संदीप थिटे, डॉ. विकास गिड्डे, योगेश तळेकर, राहुल जाधव, राहुल भोसले, प्रसाद शेट्टी, संतोष सौदणकर, चंद्रकांत सहाणे, विजयकुमार गुप्ता, विशाल काळभोर, विनोद वराडे, ऋषिकेश वाघेरे पाटील आदी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT