Pimpri Chinchwad Smart City: वेध पिंपरी-चिंचवड : राजकीय पदाधिकारी मांडणार भविष्यातील शहरासाठी भूमिका

स्मार्ट सिटी, वाहतूक, पाणी, ड्रेनेज व नागरी सुविधा यावर खुलासा; पिंपरी-चिंचवड गौरव सन्मान समारंभही
Pimpri Chinchwad Smart City
वेध पिंपरी-चिंचवड : राजकीय पदाधिकारी मांडणार भविष्यातील शहरासाठी भूमिकाPudhari
Published on
Updated on

पिंपरी : पुढारीच्या वतीने वेध पिंपरी-चिंचवडचा- भविष्यातील पिंपरी-चिंचवड या विषयावर चर्चात्मक परिसंवादाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 17) आयोजित करण्यात आला आहे. त्यात राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहराबाबत आपल्या पक्षाची भूमिका मांडणार आहेत. त्यातून भविष्यातील अधिक नियोजनबद्ध पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कशी असेल, याचे आश्वासक चित्र मांडले जाणार आहे.(Latest Pimpri chinchwad News)

Pimpri Chinchwad Smart City
Property Tax Pimpri: ऐन दिवाळीत पिंपरी-चिंचवड महापालिकेची कर वसुली मोहिम; 27 मालमत्ता जप्त

कार्यक्रम सेंट मदर टेरेसा उड्डाणपूल, काळेवाडी येथील रागा पॅलेस येथे दुपारी तीनला सुरू होणार आहे. कार्यक्रमात भाजपचे शहराध्यक्ष शत्रृघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) महानगरप्रमुख राजेश वाबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक मारुती भापकर, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, वंचित बहुजन आघाडीचे शहर सचिव राजेंद्र साळवे, बहुजन कष्टकरी जनता आघाडीचे बाबा कांबळे हे सहभागी होणार आहेत.

Pimpri Chinchwad Smart City
Property Tax Pimpri: ऐन दिवाळीत पिंपरी-चिंचवड महापालिकेची कर वसुली मोहिम; 27 मालमत्ता जप्त

पिंपरी-चिंचवड महापालिकेची तयारी सर्वच पक्षाने सुरू केली आहे. महापालिकेची प्रभागरचना अंतिम झाली आहे. आता, प्रभागनिहाय मतदार यादी बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपआपल्या पद्धतीने मोर्चेबांधणीस लागले आहेत. शहरात प्रमुख नेत्यांचे दौरे वाढले आहेत. सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत आहेत. असे असले तरी, पिंपरी-चिंचवड शहरासाठी सर्वच पक्षांचे पदाधिकारी एक होत असल्याचे आतापर्यंतचा अनुभव आहे. भविष्यातील पिंपरी-चिंचवड शहरासाठी कसे नियोजन असावे. शहरात कोणत्या सुविधा व सेवा असाव्यात, याबाबतच्या अपेक्षा या परिसंवादात मांडल्या जाणार आहेत. त्यात वाहतूककोंडी, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाण्याची कमतरता, घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेजलाईन, नदी सुधार, मेट्रो व बीआरटीचे मार्ग, शहराची झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या, शिक्षण पद्धती, क्रीडांगण, नागरी सुविधांचा महापालिकेवर येणारा ताण आदी प्रमुख्य मुद्द्‌‍यांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

Pimpri Chinchwad Smart City
Traffic Accidents: ऑफिसला पोहोचण्याची घाई.. मरणाच्या दारात नेई..!

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड गौरव सन्मान

पुढारीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पिंपरी-चिंचवड गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. राजकीय, सामाजिक, विधायक, वैद्यकीय, शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news