Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Nagar Sachiv Recruitment: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगर सचिव पदासाठी भरती; सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना संधी

करार तत्त्वावर एक वर्षासाठी नियुक्ती; पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नगर सचिव पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सेवानिवृत्त अधिकारी त्या पदावर एका वर्षासाठी मानधन तत्त्वावर नेमला जाणार आहे.

महापालिकेच्या सभा शाखेचे कामकाज सुरळीपणे पार पाडण्यासाठी नगर सचिवपद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहे. महापालिकेचे नगर सचिव मुकेश कोळप यांना अनुभव कमी असल्याने सर्वसाधारण सभेचे कामकाज व्यवस्थितपणे पार पडत नाही.

नगर सचिव कोळप हे योग्य मार्गदर्शन करत नाही, असा आरोप महापौर रवी लांडगे यांनी केला आहे. त्यामुळे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची त्या पदावर नियुक्त करण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्या पदासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

नगर सचिव पदाची नियुक्ती एक वर्षासाठी करार पद्धतीने केली जाणार आहे. त्या पदासाठी शासकीय किंवा निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी असणे आवश्यक आहे. नगर सचिव पदाच्या कामकाजाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असावा.

विधी शाखेची पदवी असावी. उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्‌‍या सक्षम असावा. उमेदवाराविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी. शिक्षा झालेली नसावी, अशी अट आहे. वय 65 वर्षापर्यंत असावे. पात्र उमेदवाराला एकत्रित मानधन दिले जाणार आहे. त्यासाठी गुरुवार (दि.30) पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT