Firewood Pudhari
पिंपरी चिंचवड

Dehuroad Firewood Price Rise: गॅस टंचाईचा परिणाम; देहूरोडमध्ये जळाऊ लाकूड 5 रुपयांनी महाग

सिलिंडर महागल्याने पुन्हा चुलीकडे वळण; सरपणाच्या मागणीत वाढ, लाकूड बाजारात दरवाढ

पुढारी वृत्तसेवा

देहूरोड: अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम भारतातील गॅस पुरवठ्यावर झाला असून, सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडर देणे बंद केले आहे. तसेच, घरगुती गॅस सिलिंडरही वेळेवर मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्यामुळे अनेकांनी चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केले आहे.

त्यामुळे देहूरोड परिसरात जळाऊ लाकडाच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून, प्रतिकिलो सुमारे पाच रुपयांनी दर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या 15 रुपये किलो दराने सरपण मिळत आहे. गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरांचा परिणाम आता थेट लाकूड बाजारावरही दिसू लागला आहे.

गॅस सिलिंडर महाग झाल्यामुळे अनेक घरांमध्ये तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून पुन्हा चुलीचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे जळणासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाची मागणी अचानक वाढली आहे. दरम्यान, अंत्यविधीसाठी गॅस उपलब्ध होण्यास अडचणी येत असल्याने जळाऊ लाकडाची मागणी आणखी वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

अचानक वाढलेल्या मागणीमुळे लाकूड बाजारात दरवाढ झाली असून. त्याचा थेट परिणाम ग््रााहकांच्या खर्चावर होत आहे. अशीच मागणी वाढत राहिल्यास येत्या काळात लाकडाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग््राामीण भागातील नागरिकांसमोर स्वयंपाकासाठीचा खर्च वाढण्याची चिंता निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळाऊ लाकडाची मागणी अचानक वाढली आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढल्यामुळे अनेक कुटुंबे तसेच हॉटेल व्यावसायिक पुन्हा चुलीकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे लाकूड वखारींमध्ये मालाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणी जास्त आणि पुरवठा मर्यादित असल्यामुळे प्रतिकिलो सुमारे पाच रुपयांनी दर वाढले आहेत. पुढील काळात मागणी अशीच वाढत राहिली तर दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
रशीद शेख, वखार मालक
गॅस सिलिंडरचे दर खूप वाढल्यामुळे आम्हाला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे; पण आता जळाऊ लाकडाचे दरही वाढले असल्यामुळे खर्च कमी होण्याऐवजी आणखी वाढत आहे. ग््राामीण भागातील सामान्य कुटुंबांसाठी हा मोठा आर्थिक ताण ठरत आहे. सरकारने गॅस सिलिंडरचे दर कमी करावेत किंवा काही पर्याय उपलब्ध करून द्यावेत.
करिम चकोली, हॉटेल व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT