Gas Shortage Chulha Cooking: गॅस टंचाईच्या अफवा; गावाकडे पुन्हा चुलीवर स्वयंपाक

सिलिंडर मिळण्याची भीती आणि वाढते दर; ग्रामीण भागात पारंपरिक चुलीचा वापर वाढला
Gas Shortage Chulha Cooking
Gas Shortage Chulha CookingPudhari
Published on
Updated on

नवलाख उंबरे: सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या विविध घडामोडी आणि इंधनासंदर्भातील चर्चेमुळे देशात गॅसटंचाई होण्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर ग््राामीण भागात नागरिकांमध्ये एक वेगळीच हालचाल दिसून येत आहे. गॅस संपण्याच्या भीतीमुळे अनेकांनी पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, गावाकडील भागात चुलीवरील जेवणाला पुन्हा जोर येताना दिसत आहे.

Gas Shortage Chulha Cooking
PCMC New Corporators Training: महापालिकेत नवख्या नगरसेवकांचा उत्साह; सभागृहात प्रशिक्षणाची मागणी

अनेक कुटुंबांनी घराच्या अंगणात किंवा मागच्या बाजूस पुन्हा चुली तयार केल्या आहेत. लाकूड, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर पारंपरिक इंधन वापरून जेवण बनवले जात आहे. काही नागरिकांनी तर रोजच्या वापरासाठी चुली कायमस्वरूपी तयार करून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलिंडर उपलब्ध न झाल्यास घरातील जेवणाची अडचण निर्माण होऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे नागरिक सांगत आहेत.

Gas Shortage Chulha Cooking
PCMC Water Tank Cleaning Contract: महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता; 2.24 कोटींच्या कामास मंजुरी

नवलाख उंबरे परिसरात वेळेवर सिलिंडर मिळत नसल्यामुळे गॅस केंद्राच्या बाहेर नागरिकांच्या लांबच्या लांब रांगा दिसत आहेत. रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्यामुळे अखेर नागरिकांना चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.

अफवांमुळे नागरिकांमध्ये भीती

गॅस टंचाईबाबत सध्या अधिकृतपणे कोणतीही गंभीर परिस्थिती जाहीर केलेली नसली तरी नागरिक खबरदारीचा उपाय म्हणून पर्यायी व्यवस्था तयार ठेवत आहेत. अफवांमुळे निर्माण झालेली भीती आणि वाढत्या इंधन दरामुळे लोक पुन्हा पारंपरिक पद्धतींकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकूणच, आधुनिक सुविधांमुळे मागे पडलेली चुलीची परंपरा आता नव्या कारणांमुळे पुन्हा गावाकडील जीवनाचा भाग बनताना दिसत आहे. भविष्यात ही पद्धत केवळ गरज म्हणून नव्हे तर पारंपरिक जीवनशैली आणि आरोग्यदायी आहाराचा पर्याय म्हणूनही पुढे येऊ शकते.

Gas Shortage Chulha Cooking
Pimpri Chinchwad Smart City Projects: स्मार्ट सिटीचे अपूर्ण प्रकल्प महापालिकेच्या माथी; पिंपरी-चिंचवडमध्ये कोट्यवधींचा भार

लग्नाचा स्वयंपाकही चुलीवर

सध्या लग्नाचा सीजन सुरू झाला आहे. तसेच, अनेक लहान कार्यक्रम सुरूच असतात. कार्यक्रमाचे सगळं नियोजन ठरलेलं असतं. पण, आता व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे हे कार्यक्रम कसे होणार? असा प्रश्न केटरींग व्यवसाय करणाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे अनेकांनी चुलीवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला आहे.

चुलीमुळे आरोग्य धोक्यात

धुरापासून त्रास कमी व्हावा म्हणून अनेकांनी गॅस सिलिंडर घेतला होता, परंतु तो आता मिळेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे महिलांना पुन्हा चुलीसमोर बसावे लागत आहे. धुरामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Gas Shortage Chulha Cooking
Pimpri Chinchwad Councillor Appointments: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवकांची नियुक्ती विलंबित; १५ एप्रिलला होऊ शकते मंजुरी

पूर्वी आम्ही सर्व जेवण चुलीवरच बनवत होतो. गॅस सिलिंडर आल्यावर ती पद्धत कमी झाली; पण आता परिस्थिती पाहता पुन्हा चुलीचा वापर वाढताना दिसत आहे.

एकनाथ शेटे, स्थानिक नागरिक

सध्या गॅस सिलिंडर संपण्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे आम्ही घराच्या मागे चुली तयार करून ठेवल्या आहेत. गरज पडल्यास चुलीवर जेवण बनवता येईल म्हणून तयारी केली आहे.

मनीषा बधाले, स्थानिक महिला

गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत आणि टंचाईबाबतही चर्चा सुरू आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी तरी चुलीचा वापर केला तर खर्चही कमी होतो. त्यामुळे आम्ही चुलीवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला आहे.

विमल भोसले, स्थानिक महिला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news