Pimpri Chinchwad RTO Pudhari
पिंपरी चिंचवड

E Challan Portal Issue: ई-चलान पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड; दंड भरूनही अपडेट होत नसल्याने नागरिक त्रस्त

ऑनलाईन दंड भरूनही पोर्टलवर नोंद न झाल्याने वाहनधारकांना आरटीओचे हेलपाटे मारावे लागत आहेत

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ई-चलान परिवहन पोर्टलवर वाहनांचा दंड ऑनलाईन भरुनही ते अद्ययावत (अपडेट) होत नसल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच, वाहनांवरील दंड कायम राहून वाहन सोडवणे, वाहन मालकी हस्तांतरण, वाहनांचे पार्सिंग अशी कामे खोळंबली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना परिवहन कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.

वाहनांचा अतिवेग, सीट बेल्ट न लावणे, लेन कटींग अशा वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर आरटीओकडून दंड आकारला जातो. वाहनांची तपासणी करताना नियमभंग करणाऱ्या वाहनांवरही ऑनलाईन ई चलनद्वारे दंड आकारला जातो.

स्पीडगनच्या माध्यामातून कारवाई होत असल्यामुळे त्याची नोंद थेट ई चलान परिवहन पोर्टलवर होत आहे. वाहनचालकांना या पोर्टलवरच दंड भरण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. दंड भरल्यानतंर पोर्टलवर ही माहिती अद्ययावत होत नसल्याने दंडाची रक्कम भरली नसल्याचे दाखवले जात आहे.

त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. पूर्वी पोर्टलवर दंड भरल्यानतंर लगेचच परिवहन विभागाच्या सारथी, वाहन या संकेतस्थाळावर माहिती अद्यावत होत असल्यामुळे आरटीओची कामे होत होती.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या ई-चलान परिवहन पोर्टलवर वाहनांचा दंड ऑनलाईन भरुनही तो अद्ययावत (अपडेट) होत नसल्यामुळे नियोजित कामे सोडून आरटीओमध्ये हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे.
विवेक पडवळ, नागरिक
नॅशनल इन्फॉमेटिक्स सेंटर (एनआयसी) मार्फत त्या अडचणी दूर करण्यात येत आहेत. पुढच्या जनरेशनचे ई-चलान सुरू केले आहे. त्यांच्यामध्ये स्थालांतर करताना या अडचणी निर्माण होत आहेत.
राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन आधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT