Adhik Maas Tradition: अधिकमासामुळे जावयाच्या वाणाची परंपरा उत्साहात; बाजारात अनारसे-चांदीच्या वस्तूंना मागणी

33 अनारसे, बत्तासे आणि चांदीच्या भेटवस्तूंसाठी खरेदीला उधाण; परंपरा आजही जोमात
Adhik Maas Tradition
Adhik Maas TraditionPudhari
Published on
Updated on

पिंपरी: अधिकमास सुरू झाला असल्यामुळे घरोघरी जावई आणि मुलीला वाण देण्यासाठी तयारी केली जात आहे. या महिन्यात जावयाचा मानपान करण्याची परंपरा आजही उत्साहाने पाळली जात असल्याचे चित्र दिसत आहे. जावयाला 33 अनारसे अथवा बत्तासे चांदीच्या तबकात दिली जाते. त्यानिमित्त बाजारातील मिठाईच्या दुकानात अनारसे खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.

Adhik Maas Tradition
Pimpri Chinchwad Scam: पिंपरी-चिंचवड 60 कोटी घोटाळा; अहवालावर प्रश्नचिन्ह, एकाच अधिकाऱ्यावर ठपका

अधिकमास 15 जूनपर्यंत असल्याने जावयाच्या सोयीने त्यांना घरी आमंत्रित करून सुग््राास भोजन, भेटवस्तू आणि मानपान केला जात आहे. मुलीला जोडवी, पूजेचे उपकरणे, एखादे सोन्याचे किंवा चांदीचे नाणे, सोन्याचे वेढे, पैंजण दिले जाते. वाण देण्यासाठी चांदीचे ताट, समई, पंचपात्र आणि चांदीचे दिवे यांनाही मोठी मागणी आहे. सोन्याचे दर अधिक असले तरी आपल्या आर्थिक क्षमतांचा अंदाज घेत खरेदी केली जात आहे.

Adhik Maas Tradition
Fake Loan App Scam: बनावट लोन ॲप्सचा धुमाकूळ; फोटो मॉर्फिंगद्वारे ब्लॅकमेलिंगचा इशारा

चांदीचे दर वाढल्याने तांबे किंवा पितळेच्या वस्तूंची खरेदी

दर तीन वर्षांनी येणाऱ्या या विशेष महिन्याला हिंदू संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. अधिक मासातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो. यंदा सोने-चांदी महागले असले तरी परंपरा आणि हौसेला मोल नसल्याने लाडक्या जावयासाठी अनमोल अशी भेटवस्तू खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीनुसार 33 अनारसे किंवा बत्तासे यांसारखे गोड पदार्थ वाण म्हणून देण्याची प्रथा आजही जपली जात आहे.

Adhik Maas Tradition
POCSO court building Pune: सप्टेंबर अखेरपर्यंत पोस्को कोर्ट इमारत पूर्ण करा; टाटा प्रोजेक्ट्‌‍सला पीएमआरडीएचा इशारा

अनेकजण चांदीचे ताट किंवा निरंजन वाण म्हणून देतात. मात्र, ज्यांची चांदीचे वस्तू देण्याची क्षमता नसेल ते तांबे किंवा पितळेचे वस्तू देतात. ताटात 33 अनारसे, बत्ताशे किंवा मैसूरपाक यापैकी कोणतातरी एक पदार्थ दिला जातो. अनेक जण स्वीट होममधून अनारसे विकत आणत आहेत. तर, अनेक घरी अनारसे तयार करण्याची लगबग दिसत आहे. तसेच, जावयाला कपड्यांचा आहेरदेखील केला जात असल्यामुळे कपड्यांच्या दुकानतही गर्दी दिसत आहे.

Adhik Maas Tradition
Pimpri Chinchwad tender fraud: फसवणूक करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांचे निलंबन

अधिकमासानिमित्त शनिवारी व रविवारी सुटीच्या दिवशी अनारसे आणि मैसूरपाक यांना जास्त मागणी असते. बत्तासेदेखील 200 रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. तसेच, अनारसे 400 ते 600 रुपये आणि मैसूरपाक 400 ते 800 रुपये किलोदराने उपलब्ध आहेत.

प्रसन्न भन्साळी, विक्रेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news