Pimpri Crime News Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Crime: चाकण हादरले! आई आणि प्रियकराने 6 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

प्रेमसंबंधातील अडथळा ठरल्याने बाळाची हत्या; पोलिसांनी आईला अटक केली असून प्रियकर फरार आहे

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी/चाकण: आई आणि तिच्या प्रियकराने संगनमत करून सहा वर्षांच्या निष्पाप बालकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाचा खून केल्यानंतर त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचा बनाव रचण्यात आला होता; मात्र हा खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील शनिवारी (दि. 4) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास चाकण औद्योगिक वसाहतीत कुरुळी (ता. खेड) येथील एका भाड्याच्या खोलीत ही घटना घडली.

अवेज मेहबूब शेख (वय 6) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणात इसाक महमद शेख (वय 49, पुस, ता. आंबेजोगाई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बसरीन मेहबूब शेख (वय 27, कुरुळी, ता. खेड, मूळ रा. धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड) हिला अटक केली असून, तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड (रा. कुरुळी, ता. खेड, मूळ रा. पुस, ता. आंबेजोगाई, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.

बसरीन शेख आणि राम कजेवाड यांचे प्रेम संबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधात सहा वर्षीय आवेज हा अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी शनिवारी रात्री त्याला बाथरूममध्ये नेले. त्याचे डोके बादलीतील पाण्यात बुडवून आणि भिंतीवर आपटून त्याला ठार मारले.

त्यानंतर मृतदेह धर्मापुरी (ता. परळी, जि. बीड) येथे नेऊन त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव केला; मात्र, यामध्ये नातेवाईकांना संशय आला. नातेवाईकांनी बीड जिल्ह्यातील परळी ग््राामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सांगितले. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली.

आवेज याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला नसून पाण्यात बुडाल्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी अवेज याच्या आईला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारपूस केली असता तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. परळी ग््राामीण पोलिसांनी हा गुन्हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT