गंगाखेड (जि.परभणी ), पुढारी वृत्तसेवा : उस्मानाबाद जिल्ह्यातील औराद शहाजानी येथे १९७० च्या सुमारास दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय स्थापनेप्रसंगी लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास गंगाखेड शहर व परिसरातून त्यावेळी एक ट्रकभर युवक कार्यक्रमास गेले होते. रविवारी लता मंगेशकर यांच्या दुःखद निधनानंतर लक्ष्मणराव अन्ना झ़ोलकर, नाट्यकर्मी मुरलीधरराव मुरकुटे, नाट्यकर्मी प्रकाश घन यांनी आपल्या आठवणींना या निमित्ताने उजाळा दिला.
लता मंगेशकर यांचा मराठवाड्यात येण्याचा फारसा योग आला नसल्याची माहिती शहरातील जुनाजाणत्यानी दिली. मात्र लता मंगेशकरांच्या आठवणींंबद्दल सांगताना झोला येथील जेष्ठ नागरिक तथा श्री संत जनाबाई महाविद्यालयाचे संचालक लक्ष्मण रावांना झोलकर नाट्यकर्मी मुरलीधरराव झोलकर व नाट्यकर्मी तथा सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश घन दै'पुढारी' शी बोलत होते.
लता मंगेशकर यांच्याविषयीच्या आठवणी बद्दल सांगताना लक्ष्मणराव झोलकर व प्रकाश घन यांनी आपला अनुभव कथन केला साधारणतः १९७० च्या आसपास उस्मानाबाद जिल्ह्यातील औराद शहाजानी येथे दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी लता मंगेशकर यांच्या गायनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
भर पावसाळ्यात झालेल्या या कार्यक्रमास साधारणता पाचशे रुपये दोघात असे किती होते गंगाखेड शहरातील सुमारे ४० ते ४५ युवक एका ट्रक द्वारे औराद शहाजानी येथे कार्यक्रम पाहण्यासाठी गेल्याची आठवण मुरकुटे व घन यांनी पुढारी शी बोलताना सांगितली. अगदी महाविद्यालयीन आयुष्यातील या कार्यक्रमांच्या आठवणी सांगताना झोलकर व घन गहिवरून गेले होते.
हे ही वाचलं का