

पुढारी ऑनलाईन डेस्क : गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर ह्या राज्यसभेच्या खासदार असतांना १७ वर्षांपूर्वी येथील के के एम महाविद्यालयात नाट्यगृहाच्या उभारणीसाठी तब्बल २० लाखाचा निधी दिला होता .
तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा पी डी पाटील व जेष्ठ पत्रकार मोहन धारासुरकर यांनी मुंबई येथे लतादीदीच्या निवासस्थानी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सभागृह उभारण्यासाठी निधी देण्यासाठी विनंती केली तसेच जागेचे कागदपत्रे सादर केली . दिदींनी तात्काळ २० लाखाचा निधी मंजूर केला . १० जून २००५ रोजी निधी वळविण्याचे पत्र दिदींनी परभणी जिल्हाधिकारी यांना दिले होते . दीदीच्या प्रेमाची निशाणी म्हणून आज येथील के के एम महाविद्यालयात सभागृह आहे .
हे ही वाचलं का