कोल्हापूर ,पुढारी ऑनलाईन : शनिवारपासून पावसाने उसंत दिल्याने पंचगंगा नदीची (panchanganga river flood) पाणीपातळी तीन फुटांनी उतरली असून नदी ५२. १ फुटांवरून वाहत आहे. पंचगंगा नदीला (panchanganga river flood) महापूर असला तरी शहरात मात्र पिण्याच्या पाण्याचे माठे संकट आले आहे.
अनेक ठिकाणी लहान मुले, महिला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत आहेत.
अधिक वाचा:
शनिवारी सकाळपासून पावसाने उसंत दिली आहे. दिवसभरात आकाश निरभ्र राहिले त्यामुळे पाणी ओसरू लागले आहे.
सकाळी नऊ वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगा नदीची पाणीपातळी ५२. १ फूट होती.
जिल्ह्यातील नद्यांचा महापूर ओसरत असून ९१ बंधार पाण्याखाली आहेत. शुक्रवारी तब्बल ११६ बंधारे पाण्याखाली होते.
त्यामुळे जिल्ह्याती वाहतूक विस्कळित झाली होती.
अधिक वाचा:
सध्या महामार्गावर तीन फूट पाणी असून वाहतूक बंदच आहे. पंचगंगेची पाणीपातळी ४९ फुटांवर आल्यानंतर महामार्गावरील पाणी जाऊ शकते. त्यानंतरच वाहतूक सुरू होऊ शकते.
पावसाची उघडीप दिवसभर अशीच राहिल्यास सायंकाळपर्यंत महामार्ग खुला होऊ शकतो.
अधिक वाचा:
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू असून धरण ९८ टक्के भरले आहे.
धरणाच्या विद्युत प्रकल्पातून १४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडू शकतात. सध्या जिल्ह्यातील सर्वच नद्याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे.
अधिक वाचा:
जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणची शेती वाहून गेली आहे.
नदीकाठची पिके आठवडाभर पाण्यात असल्याने ती कुजली आहेत. अनेक ठिकाणी बांध फुटल्याने पिके गाळात गाडली गेली आहेत.
त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनेक ठिकाणी केलेली दुबार पेरणीही वाया गेली आहे.