नागपूर ; पुढारी वृत्तसेवा
कुही तालुक्यातील वेलतुर पोलिस ठाण्यातंर्गत आज (गुरूवार) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आम नदीत डोंगा (नाव) उलटून एक महिला बुडाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत चार महिला बजावल्या.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार, मौजा कुजबा येथील ५ महिला कापूस वेचण्याकरिता आम नदीच्या पलीकडील शेतमालक परमानंद तिजारे यांच्या शेतामध्ये त्यांच्याच डोंग्याने जात होत्या. आम नदीच्या पात्रात अचानक डोंगा फुटला. डोंग्यामध्ये पाणी भरले. महिलांनी आरडाओरड सुरू केली. महिलांच्या हालचालीमुळे डोंगा पलटी झाली. त्यामध्ये गीता रामदास निंबारते यांचा बुडून मृत्यू झाला.
मनू सुरेश साळवे, मनीषा राजू ठवकर, लक्ष्मी लोमेश्वर गिरी, मंगला देवराव भोयर व परमानंद रामचंद्र तिजारे हे वाचले. त्यांच्यावर मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. लक्ष्मी लोमेश्वर गिरी व परमानंद रामचंद्र तिजारे यांना प्राथमिक उपचार करून नागपूर मेडिकलमध्ये दाखल केले आहे.
हेही वाचलं का?