Latest

Omicron Test : ओमायक्रॉन टेस्‍ट किट आजपासून होणार उपलब्‍ध, जाणून घ्‍या किंमत

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉन टेस्‍ट किट ( Omicron Test ) आजपासून बाजारात उपलब्‍ध होणार आहे. हे टेस्‍ट किट 'टाटा मेडिकल'ने तयार केले आहे. भारतीय वैद्‍यकीय संशोधन परिषद ( आयसीएमआर) या संस्‍थेने ३० डिसेंबर रोजी मंजुरी दिली होती. आता ओमायक्रॉन संसर्ग झाल्‍याची लक्षणे आढळल्‍यास तुम्‍ही चाचणी करु शकता. मात्र ही चाचणी प्रयोगशाळेत करता येणार आहे.

Omicron Test : कशी होईल चाचणी, अहवालास किती वेळ लागेल ?

ओमायक्रॉन टेस्‍ट किट हा आरटीपीसीआर टेस्‍ट किट सारखेच काम करेल. या चाचणीसाठी नाक किंवा तोंडातून स्‍वॉब
घ्‍यावा लागेल. यानंतर १० ते १५ मिनिटांमध्‍ये ओमायक्रॉनची लागण झाली आहे का? याची माहिती मिळेल.

 किटची किंमत

टाटा मेडिकलने तयार केलेल्‍या ओमिस्‍योर टेस्‍ट किटची किंमत ही २५० रुपये आहे. बाजारात उपलब्‍ध अन्‍य किटच्‍या तुलनेतही ही स्‍वस्‍त आहे. मात्र याला प्रयोगशाळा अतिरिक्‍त शुल्‍क जोडल्‍यास चाचणीची किंमत वाढू शकते.

Omicron Test : घरात करता येणार नाही चाचणी

टाटा मेडिकलने तयार केलेल्‍या ओमिस्‍योर टेस्‍ट किटमधून तुम्‍ही घरी चाचणी करु शकणार नाही. स्‍वॉब घेवूनच ही चाचणी होणार असल्‍याने तुम्‍हाला प्रयोगशाळेतच ही चाचणी करावी लागेल. टाटा मेडिकल ही कंपनी दर महिन्‍याला दोन लाख टेस्‍ट किट उत्‍पादनाची क्षमता आहे. या किटची निर्यात करण्‍याचाही कंपनीचा विचार आहे. यासाठी युरोपियन युनियन आणि अमेरिकेतील फूड ॲण्‍ड ड्रग ॲडमेनिस्‍ट्रेशनकडे अर्ज करणार असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

ओडिशाने दिली ५ लाख टेस्‍ट किटची ऑर्डर

ओडिशा टेस्‍ट मेडिकल कार्पोरेशन लिमिटेडने ओमिस्‍योर टेस्‍ट किटची ऑर्डर दिली आहे. ओडिशा हे पहिले राज्‍य ठरले आहे जे कोरोना चाचणीबरोबरच आता ओमायक्रॉन संसर्गाचीही चाचणी करणार आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT