मुंबई; पुढारी ऑनलाईन
नुकतेच बॉलिवूडने एक आलिशान लग्न सोहळा अनुभवला आहे. तो म्हणजे विकी कौशल आणि कॅटरिना कैफ ( katrina kaif and vicky kaushal ) यांचा. विकी कौशल आणि कॅटरिना यांचे जुळले तेव्हा पासून ही जोडी बॉलिवूड मधील हॉट कपल ठरली आहे. यांच्या लग्नाच्या चर्चेला अगदी उधान आले होते. या लग्नसोहळ्याचा तामजाम घरबसल्या अवघ्या देशाने अनुभवला. पण, या दोघांबाबत एक अनोखी घटना घडलेली आहे. की, हे बॉलिवूडचे असे फेव्हरेट कपल ज्यांनी आत्ता पर्यंत कधी ही एकत्र पडद्यावर काम केलेले नाही. तरी सुद्धा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आणि त्यांनी विवाह सुद्धा केला. आता यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे हे दोघे एकत्र एका सिनेमात प्रथमच आपल्या एकत्र दिसणार आहे. सारे काही सुरळीत पार पडले तर पुढील वर्षी आपण या दोघांचा चित्रपट नक्कीच पडद्यावर पाहू.
अभिनेता दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तर आपल्या नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे. सध्या तो 'जी ले जरा' या चित्रपटाच्या तयारीत लागला आहे. हा चित्रपट एक रोड ट्रिपच्या धर्तीवर आहे. पण यावेळी ही ट्रिप तीन मैत्रीणींची असेल. या चित्रपटासाठी प्रियांका चोप्रा, आलिया भट आणि कॅटरिना कैफ यांना या आधीच निवडण्यात आले होते. तसेच यातील या पुरुष नायकाची भूमिका फरहान स्वत:च करणार आहे. त्यामुळे उर्वरीत दोन अभिनेत्यांचा शोध चालू होता. या चित्रपटात कॅटरिनाचा समावेश असल्यामुळे तिचा लव्ह इंटरेस्ट म्हणून या चित्रपटात विकी कौशल असेल. या भूमिकेसाठी विकी कौशलला निवडणे फार अवघड नव्हते अशी प्रतिक्रिया फरहानने दिली आहे. विकी कडे सध्या त्याच्या पुढील प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. सगळे काही सुरळीत पार पडले तर निश्चित या चित्रपटात आपण कॅटरिना आणि विकी कौशलला ( katrina kaif and vicky kaushal ) एकत्र रोमान्स करताना पडद्यावर पाहू.
फरहान अख्तर त्याची बहिण झोया अख्तर आणि रिमा कागती या तिघांनी या चित्रपटाची कथा लिहली आहे. फरहान आणि रितेश सिधवाणी यांचा प्रोडक्शन हाऊस एक्सल एंटरटेंमेंटने नुकतेच २० वर्षे पूर्ण केली. या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यामतून दिल चाहता है ( 2001) आणि जिंदगी मिलेगी ना दोबारा (2011) या रोड ट्रिपवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती. आता 'जी ले जरा' या पुढील चित्रपट असणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. पण, हा चित्रपट २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटील येऊ शकतो. ( farhan akhtar )