Latest

ODI World Cup 2023 | नेदरलँडच्या विजयानंतर वसीम जाफरने द. आफ्रिकेची उडवली खिल्ली

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी विश्वचषकात धक्कादायक विजयाची मालिका सुरू झाली आहे. अफगाणिस्तानने इंग्लडला हरवल्यानंतर नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून खळबळ उडवून दिली. दक्षिण आफ्रिकेचा ३८ धावांनी पराभव करून नेदरलँडने विश्वचषकाच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. या विजयाबद्दल जगभरातील क्रिकेटप्रेमींकडून संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यादरम्यान माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक जुना व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्याने नेदरलँडच्या विजयावर आनंद व्यक्त दक्षिण आफ्रिकेची खिल्ली उडवली आहे.

संबंधित बातम्या : 

वसीम जाफरने 'X' वर एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती शकीराचे प्रसिद्ध गाणे 'वाक्का, वाक्का दिस टाइम फॉर आफ्रिका' गाताना दिसत आहे. 'प्रत्येक विश्वचषकात नेदरलँडची कामगिरी,' असे जाफरने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे.

याआधी नेदरलँडने २००७ च्या विश्वचषकात स्कॉटलंडला आणि २००३ मध्ये नामिबियाला पराभूत केले होते. नेदरलँड्सने झिम्बाब्वे आणि आयर्लंड व्यतिरिक्त कोणत्याही पूर्ण सदस्य राष्ट्राचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपूर्वी नेदरलँड्सने झिम्बाब्वेचा ५ विकेट्सने पराभव केला होता.

मंगळवारी धर्मशाळा येथे झालेल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. या सामन्यात नेदरलँडने प्रथम फलंदाजी करताना ४३ षटकांत २४५ धावा केल्या. यामध्ये कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाबाद ७८ धावा, रोएलॉफ व्हॅन डेर मर्व्ह याने २९ धावा आणि आर्यन दत्तने २३ धावांची शानदार खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २०७ धावांत गडगडला. यामध्ये लोगान व्हॅन बीकच्या ३ विकेट्ससह पॉल व्हॅन मीकरेन, रोएलॉफ व्हॅन डेर मर्व्हे आणि बास डी लीडे यांच्या प्रत्येकी २ विकेट्सचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी फक्त डेव्हिड मिलर ४३ धावांची खेळी करू शकला.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT