neha dhupia 
Latest

Neha Dhupia दुसऱ्यांदा झाली आई, दिला मुलाला जन्म

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड कपल नेहा धूपिया (Neha Dhupia) आणि अंगद बेदी यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झालं आहे. नेहा धुपिया (Neha Dhupia) दुसऱ्यांदा आई झालीय. नेहाने मुलाला जन्म दिलाय. ही आनंदाची बातमी अंगदने सोशल मीडियावरून दिलीय.

अंगद बेदीने पत्नी नेहासोबत फोटो शेअर केलाय. त्याने लिहिलंय- परमेश्वराने आज आम्हाला एक मुलगा दिला. नेहा आणि बाळ दोघे ठिक आहेत. नेहा या प्रवासात एक योद्धा बनून राहिलीस, यासाठी तुझे धन्यवाद.'

काही महिन्यांआधी नेहा -अंगदने तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. दोघांनी फॅमिली फोटो शेअर करत लिहिले होते की, ते आता चार होणार आहेत. या वृत्तावर दोन्ही कुटुंबीय आणि फॅन्सने आनंद व्यक्त केलाय.

नेहा-अंगदला पहिली मुलगी आहे. तिचे नाव मेहर आहे. तिचा जन्म २०१८ मध्ये झाला होता. असं म्हटलं जातयं की, नेहा आपल्या लग्नाआधीचं प्रेग्नेंट होती.

दोघांनी २०१८ मध्ये दिल्लीतील एका गुरूद्वारामध्ये लग्न केले होते. हे लग्न प्रायवेट सेरेमनी होती. या लग्नाविषयी केवळ कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांनाचं माहिती होती.

दोघांच्या लग्नाचा खुलासा झाल्यानंतर मीडिया ते फॅन्स आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनाही मोठा धक्का बसला होता. दोघे एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते. दोघांमधील अफेअरविषयी लोकांना माहिती नव्हती.

प्रेग्नेंसीच्या अखेरच्या काळात मॅटरनिटी शूट

तिने प्रेग्नेंसीच्या अखेरच्या काळात मॅटरनिटी फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमध्ये नेहा बोल्ड अंदाजात दिसत होती. या फोटोशूटवर नेहाच्या फॅन्सनी कौतुकाचा वर्षाव केला होता. अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील ॲक्टिव्ह असते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर करते. दरम्यान, तिने मॅटरनिटी फोटोशूट केले होतं. या फोटोशूटमध्ये तिचा बोल्ड अंदाज फॅन्सना खूप आवडला होता. तिचे प्रेगेंन्सी काळातील फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर गतीने व्हायरल होत आहेत.

दरम्यान, तिने इन्स्टाग्रामवर याआधी आपला एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ता बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत होती. फोटोमध्ये ती ब्रालेट आणि शॉट्समध्ये दिसते. सोबत तिने नेटचा टॉप घातलेला दिसतो. त्याआधी तिने आणखी एक फोटो शेअर केला होता. यामध्ये अभिनेत्री व्हाईट कलरचा शर्ट आणि शॉट्समध्ये दिसत होती. या पेहरावासोबत तिने बूटदेखील घातले होते. तिचा हा लूक सर्वांच्या पसंतीस उतरला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT