उल्हासनगर; पुढारी वृत्तसेवा : प्रल्हाद मोदी : व्यापारी हा देशातील प्रमुख घटक आहे, व्यापार्यांनी एकजूट दाखविल्यास राज्य सरकारच काय, केंद्र सरकारदेखील तुमच्या मागणीपुढे झुकेल, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी उल्हासनगरमधील व्यापार्यांना दिला. सुविधा मिळत नसतील तर वेळ पडल्यास जीएसटी भरू नका, शासनाची कोंडी करा, असे आवाहनदेखील त्यांनी व्यापार्यांना केले.
उल्हासनगर शहरातील यूटीए म्हणजेच उल्हासनगर ट्रेंड असोसिएशन या व्यापारी संघटनेच्या वतीने सोमय्या हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे आवाहन केले. प्रल्हाद मोदी हे ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत.
ते पुढे म्हणाले की, व्यापार्यांनी जीएसटी व अन्य कर भरूनदेखील त्यांना जर सुविधा मिळत नसतील तर त्यांनी जीएसटी भरू नये. या संदर्भात उदाहरण देताना ते म्हणाले की, महाराष्ट्रानंतर सर्वाधिक जीएसटी भरणारे गुजरात हे राज्य आहे. आम्ही काही वर्षांपूर्वी एकजूट दाखवून जीएसटी भरणार नाही, असा इशारा केंद्र सरकारला देताच त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या. तुम्हीदेखील अशीच ताकद दाखवा.
अधिक वाचा