नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या (Corona) संख्येत सौम्य वाढ नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभरात ४ हजार ५७५ कोरोनाबाधितांची भर पडली. सोमवारी केवळ ३ हजार ९९३ कोरोनाबाधित आढळले होते. गेल्या एका दिवसात १४५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. तर,७ हजार ४१६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.६९ टक्के नोंदवण्यात आला. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर ०.५१ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ०.६२ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.
देशातील ४ कोटी २४ लाख १३ हजार ५६६ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर (Corona) मात मिळवली आहे. तर, ४६ हजार ९६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख १५ हजार ३५५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १७९ कोटी ३३ लाख ९९ हजार ५५५ डोस लावण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभरात १८ लाख ६९ हजारांहून अधिक डोस देण्यात आले. खबरदारी म्हणून आतापर्यंत २.०८ कोटी बूस्टर डोस देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारडून पुरवण्यात आलेल्या १८० कोटी ३० लाख ५९ हजार ६०० डोस पैकी १५ कोटी ८० लाख ५४ हजार ३३६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत ७७ कोटी ५२ लाख ८ हजार ४७१ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ८ लाख ९७ हजार ९०४ तपासण्या मंगळवारी दिवसभरात करण्यात आल्याचे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे.
श्रेणी बूस्टर डोस
१) आरोग्य कर्मचारी ४२,६८,७३४
२) फ्रंटलाईन वर्कर्स ६४,४१,४८०
३) ६० वर्षांहून अधिक १,०१,४६,३७१
हेही वाचलंत का ?