नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
भारताने कुठल्याही देशावर हल्ला केला नाही. कुठल्याही देशाची एक इंच जमीन काबीज केली नाही. भारताने ठरवले असते, तर १९७१ च्या युद्धात जमिनीवर कब्जा करू शकला असता. पंरतु,भारताची अशी प्रवृत्ती आणि प्रकृती नाही,अशी भावना पाकिस्तानचे नाव न घेता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. शनिवारी 'फिक्की'च्या ९४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीला त्यांनी संबोधित केले.
भारत एक उदयास येणारी अर्थव्यवस्था आहे. देशाकडे तरुण प्रशिक्षित वैज्ञानिक, तंत्रज्ञ तसेच व्यवस्थापकीय कौशल्य आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये भारतीय 'सीईओ' आहेत. संरक्षण क्षेत्रातील बहुतांश योजनांची 'टाईम लाईन' महिन्यांमध्ये नाही तर वर्षांमध्ये असते. काही योजनांना पूर्णत्वास नेण्यासाठी दशकांचा कालावधी लोटतो; पंरतु भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर या क्षेत्रात बरेच काम झाले. प्रत्येक योजनांची 'टाईम लाईन' कमी करण्यात बर्याच प्रमाणत यश मिळाले आहे, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.
देशातील जवळपास ५५% लोकसंख्येचे संपुर्ण लसीकरण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'व्हॅक्सिन डिलीव्हरी'ची 'टाईम लाईन' पूर्णत: घटवली आहे. कोरोना महारोगराई दरम्यान लसीवर काम करून ती लावण्यास सुरूवात करण्यात आली. यापूर्वीच सरकार जे काम करण्यासाठी वर्षभराहून अधिकचा वेळ घ्यायचे ते काम आता चुटकीसरशी होवू लागले आहेत. हळूहळू कोरोनाच्या कठीण काळातून देश बाहेर येत आहे. संरक्षण क्षेत्र कोरोनाच्या आव्हाणावर वेगाने विजय मिळत मार्गक्रम करीत असल्याचेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
हेही वाचलं का?