BJP Minister Married Congress leader: राजकारणापायी एकमेकांची डोकी फोडणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पाडणारी घटना मध्य प्रदेशात घडली आहे. मध्यप्रदेशचे माजी मंत्री दीपक जोशी यांनी काँग्रेस नेत्या पल्लवी सक्सेना यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. दीपक जोशी हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे सुपूत्र आहेत. त्यांनी ४ डिसेंबर रोजी पल्लवी यांच्यासोबत अत्यंत खासगी कार्यक्रमात आर्य समाजाच्या पद्धतीनं लग्न केलं.
या विवाह सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आधी हे फोटो पल्लवी यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. नंतर मात्र त्यांनी हे फोटो डिलीट केले. या फोटोवर काँग्रेस नेते विजेंद्र शुक्ला यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती.
दीपक जोशी यांची पहिली पत्नी विजया जोशी यांचा २०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला होता. दीपक जोशी यांच्यावर दोन महिलांशी संबंध असल्याचे देखील वैयक्तिक आरोप झाले होते. राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते मध्य प्रदेशचे शालेय शिक्षण मंत्री राहिले आहेत. मात्र ते २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी २०२३ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र पुन्हा पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये घरवापसी केली.
दीपक जोशी यांचे वडील कैलाश जोशी हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. एवढा मोठा राजकीय वारसा असूनही दीपक जोशी यांची वैयक्तिक आणि राजकीय आयुष्य हे वादग्रस्त राहिलं आहे.
दरम्यान, दीपक जोशी यांच्याबद्दल दोन महिलांनी देखील लग्नाचे दावे केले होते. शिखा यांनी २०१६ ला लग्नाचा दावा केला होता. तर दीपक यांची पहिली पत्नी विजया यांचे २०२१ मध्ये निधन झाले होते. शिखा यांचे पती गौतम हे २०१८ - १९ पर्यंत एकत्र होते.
नम्रता यांच्यासोबत दीपक जोशी यांचे घटस्फोट प्रकरण सध्या कोर्टात आहे. दीपक जोशींची नवविवाहित पत्नी पल्लवी यांनी नम्रता ही फरार असल्यानं तिच्याविरूद्ध आयटी अॅक्ट अंतर्गत वॉरंट जारी असल्याचं सांगितलं.
पल्लवी यांनी भावूक होत सांगितलं की हे फक्त लग्नाचं नातं नाही तर आम्ही एकमेकांचा सहारा आहोत. पल्लवी गेल्या १७ वर्षापासून घटस्फोटाच्या वेदना झेलत आहेत. त्यांना पॅरेलेसिसचा अटॅक देखील आला होता. त्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. दीपक जोशी यांनी त्यांना मानसिक आधार दिला अन् बळ दिलं.
पल्लवीचा मुलगा साहिब दीपक जोशी यांना आपला वडील मानतो आणि दीपक यांची मुले पल्लवी यांना आईच्या स्वरूपात पाहतात. पल्लीवीनं सांगितलं की ज्यावेळी ह्रदय आणि विचार मिळतात त्यावेळी वय तितकं महत्वाचं नसतं.'