Delimitation Bill pudhari
राष्ट्रीय

Delimitation Bill: ठाकरे गट फोडल्यानंतर आता दक्षिण दिग्विजयाची तयारी... डीलिमिटेशनचं गणित NDA च्या आलं आवाक्यात?

Anirudha Sankpal

Delimitation Bill: भारतीय राजकारणात आता विरोधी पक्षाचे खासदार फोडाफोडी हा नित्य नियम झाला असून रोज कोणा ना कोण उठतो आणि विरोधकांचे खासदार काखेत मारून घेऊन जातो. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीच्या खासदारांची चोरी केल्यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या नऊ पैकी ६ खासदारांना फुस लावून पळवून आणलं आहे.

दुसऱ्याचे खासदार पळवापळवीला जोर

आता सत्तेला कोणताही धोका नसतानाही एनडीएमधील भाजपचे सहकारी एका इशाऱ्यावर विरोधकांचा खासदार का फोडत आहेत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. ही सगळी मेंढरांसारखी खासदारांची जुळवाजुळव फक्त आणि फक्त डीलिमिटेशन बील (मतदारसंघ पुर्नरचना विधेयक) पास करून घेण्यासाठी सुरू आहे. हे बील एप्रिल महिन्यात लोकसभेत ५४ मतांनी पडलं होते.

आता हे बील पुन्हा सादर करून पास करण्यासाठी एनडीएने विरोधकांचे खासदार फोडाफोडी सुरू केली आहे. तृणमूल काँग्रेसचे २० खासदार फोडून आपल्या गोटात खेचल्यानंतर आता शिंदेंनी ठाकरेंच्या सेनेला सुरूंग लावत ६ खासदार पळवले. त्यामुळं हा आकडा आता २६ वर झाला आहे.

लोकसभेत ३६२ मॅजिक फिगर

लोकसभेत ५४३ खासदार आहेत. दोन तृतिआंश आकड्यासाठी ३६२ खासदारांची गरज आहे. मात्र तीन जागा रिक्त असल्यानं हा आकडा आता ३६० वर आला आहे. एनडीएकडे सध्या तृणमूल काँग्रेसचे पकडून ३१८ खासदार लोकसभेत आहेत. विरोधकांकडे १८४ खासदारांचे संख्याबळ आहे. त्याचबरोबर ३८ खासदार हे कोणत्याही गटाचे नाहीत. डीलिमिटेशन बील लोकसभेत पास करून घेण्यासाठी सरकारला अजून ४२ खासदारांची गरज आहे.

मात्र हा आकडा फक्त कागदावर आहे. नियमानुसार त्यावेळी जेवढे खासदार मतदानासाठी उपस्थित आहेत तोच आकडा बॉमलाईन मानला जातो.

टीएमसी, उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी बळ वाढवलं

उदाहरणार्थ महिला आरक्षण बीलवेळी ५४० पैकी ५२८ खासदारच मतदानावेळी उपस्थित होते. त्यामुळं बहुमताचा आकडा ३५२ आला होता.

डाटानुसार २९८ मते ही सरकारच्या बाजूने पडली होती. लोकसभेत हे बील ५४ मतांनी पडलं होतं. त्या परिस्थितीत १२ खासदार उपस्थित नव्हते. सरकारला आता ५४ खासदारांची गरज आहे.

या ५४ खासदारांपैकी आता तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचा कळप एनडीएत दाखल झाला आहे. आता ते तृणमूलचे नाही तर एनसीपीआय पक्षाचे खासदार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरेंचे ६ खासदार असे मिळून हा आकडा २६ वर पोहचतो.

आता दक्षिण दिग्विजयाची बात करूयात

दक्षिणेत तमिळ नाडूतील राजकारणानं कुस बदलली आहे. तिथं टीव्हीकेला काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर डीएमके इंडिया आघाडीतून बाहेर पडली आहे. आता भाजपसाठी ती खासदारांची टोळी देखील ओपन आहे. डीएमकेकडे सध्या २२ खासदार आहेत. सरकार त्यांच्यासोबत चर्चा करत आहे अशी हिंट मिळाली आहे. जर डीएमकेच्या मागण्या मान्य झाल्या तर एनडीएची टॅली ही ३४८ होईल. अशा परिस्थितीत एनडीएला फक्त ६ खासदारांची गरज आहे.

हे सहा खासदारांची कमतरता कोण भरून काढू शकतं तर ते आहेत समाजवादी पक्षाचे खसदार! ओम प्रकाश राजभर यांनी याबाबतचे संकेत कालच दिले आहेत. त्यांनी एसपीमध्ये देखील उभी फूट पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

भाजपने इंडिया आघाडीतील इतर लहान पक्षावरही त्यांची नजर असेल असे संकेत दिले आहेत. भाजपच्या काही नेत्यांनी ते एनडीएमधील काही छोट्या पक्षांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे. त्यातील एक पक्ष हा महाराष्ट्रातील आहे.

राज्यसभेचं गणित कसं?

राज्यसभेत १६४ हा दोन तृतिआंश बहूमताचा आकडा आहे. राज्यसभेची जास्तीजास्त २५० ही स्ट्रेंथ आहे. सध्या २४५ राज्यसभा खासदार आहेत. त्यातील १५० खासदार हे एनडीएकडे आहेत. जर डीएमकेचे ८ खासदार मिळाले तर त्यांचा आकडा १५८ इतका होते. त्यांना आता फक्त ६ राज्यसभा खासदारांची गरज आहे. राज्यसभा बाय इलेक्शनमध्ये हे सहा खासदार एनडीला मिळण्याची शक्यता आहे. तीन तृणमूल खासदारांचा राजीनामा झाल्यानंतर आणि इतर लहान पक्षांच्या मदतीने एनडीए १६४ ची मॅजिक फिगर गाठू शकते.

असं झालं तर दोन्ही सभागृहात महिला आरक्षण अन् त्याच्या आडून डीलिमिटेशन बील पास होऊ शकले. हे सर्व पावसाळी अधिवेशनापूर्वी होऊ शकते. पावसाळी अधिवेशन हे पुढच्या महिन्यात होणार आहे. अनेकांच्या मते याच संख्याबळाच्या जोरावर वन नेशन वन इलेक्शन बील देखील पास करून घेतलं जाऊ शकतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT