DU Student Muskan Case pudhari
राष्ट्रीय

DU Student Muskan Case: नातं तोडल्याच्या रागातून 21 वर्षाच्या तरुणीचा जिम ट्रेनर इम्रानकडून खून; पोलिसांवरही केला गोळीबार

इम्रानवर यापूर्वीही पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, ड्रग्जचाही इतिहास

Anirudha Sankpal

DU Student Muskan Sharma Murder: २६ वर्षाच्या जीम ट्रेनरवर दिल्ली विद्यापीठातील २१ वर्षाच्या तरूणीचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही विद्यार्थिनी तसेच कंटेट क्रिएटर असून या प्रकरणी पोलिसांनी त्या जीम ट्रेनरला अटक केली आहे. मात्र राजौरी गार्डन येथे रात्री पोलिस अटक करायला गेले असताना गोळीबार देखील झाल्याचे पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी सांगितलं की तरूणीने ज्यावेळी जीम ट्रेनर सोबत नातं संपवण्याचा निर्णय घेतल्यावर जीम ट्रेनर रागात होता.

पोलिसांवरही गोळीबार

आरोपी अकिब उर्फ इम्रान याला अटक केली असून त्याने पोलिसांवर देखील गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की समोरून फायरिंग झाल्यावर प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील गोळीबार केला. त्यात त्याच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. यात कोणताही पोलीस जखमी झालेला नाही.

डीसीपी हरेश्वर स्वामी यांनी सांगितलं की, 'पोलिसांनी सांगितलं की आम्हाला इम्रानबाबत विशेष माहिती मिळाली होती. तो साधारणपणे रात्री १०.५५ च्या सुमारास या भागात येणार अशी माहिती मिळाली होती. आमची टी तिथं पोहचली. पोलिसांनी त्याला सरेंडर होण्यास सांगितलं. मात्र त्याने अचानक आपली पिस्तुल काढून पोलिसांच्या दिशेने फायरिंग सुरू केली.

त्यानंतर कॉन्स्टेबल जितेंदर यांनी प्रत्युत्तरात फायरिंग केलं. आधी हवेत वॉर्निंग शॉट फायर करण्यात आला. मात्र तरी देखील त्याने फायरिंग सुरूच ठेवली. त्यानंतर जितेंदर आणि हेड कॉन्स्टेबल नंद किशोर यांनी तीन राऊंड फायर केले. ते त्याच्या पायावर मारण्यात आले. यानंतर इम्रानला ताब्यात घेऊन त्याला गुरू गोविंद सिंग रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

26 ऑगस्ट रोजी काय झालं?

२६ ऑगस्ट रोजी मुस्कान शर्माचा खून झाला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी १५ तपास पथके रवाना केली होती. या प्रकरणी २७ ऑगस्ट रोजी तिलक नगर पोलीस ठाण्यात कलम १०३(१) अंतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे.

यानंतर पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. पोलिसांनी इम्रानच्या हालचालींचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी इम्रान २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता मुस्कानच्या घरी जाताना दिसला. त्यानतंर तो ६ ला तेथून बाहेर पडला त्यामुळं तो या प्रकरणातील मुख्य संशयीत होता.

मुस्कान ही दिल्ली विद्यापीठात स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या दुसऱ्या वर्षाला होती. ती कंटेट क्रिएटर देखील होती. तसेच ती पार्ट टाईम मॉडेलिंग देखील करत होती. ती कुटुंबीय आणि भावंडांसोबत मंगला हॉस्पिटलजवळ भाड्याने रहात होती.

नातं तोडलं तरी, सोडलं नाही

पोलिसांनी सांगितलं की इम्रान हा मुस्कानला गेल्या १८ महिन्यांपासून ओळखत होता. त्यांची भेट जीममध्ये झाली होती. ते दोघे एकत्र ट्रेनिंग करत होते. जीममधील इतर साथीदारांनी सांगितलं की इम्रानने त्या जीममध्ये तीन महिने काम केले. त्यानंतर त्याला काढून टाकण्यात आले. त्याला ग्राहकांसोबत चुकीचे वर्तन केल्यामुळं काढून टाकण्यात आले होते.

पोलिसांनी सांगितलं की मुस्कानला इम्रानचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा संशय आल्यावर तिने आपलं इम्रान सोबतचं नातं सपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना संशय आहे की इम्रानला मुस्कानने दुसऱ्या पुरूषांशी बोलणे आवडत नव्हते त्याला त्याचा राग यायचा.

पोलिसांनी सांगितलं की मुस्कानने १८ जुलै रोजी इम्रान हा तिला छळतोय हे सांगण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती. मात्र तिने अधिकृत तक्रार दाखल केली नव्हती. इम्रानची ड्रग्ज युजचा देखील इतिहास आहे. त्याला नशामुक्ती केंद्रात देखील पाठवण्यात आले होते. तिथून त्याला ३० जुलै रोजी सोडूण्यात आलं. या सेंटरमध्ये त्याने स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न केला होता.

घरी एकटी पाहून...

२६ ऑगस्ट रोजी इम्रान मुस्कान घरी एकटी असताना तिच्या घरात गेला. तिथे त्यांचा वाद झाला. त्यावेळी इम्रानने मुस्कानला अनेकवेळा भोसकलं. त्यानंतर तो तिथून पळून गेला. पळून जाताना त्याने तिचा मोबाईल देखील नेला होता. मात्र तो अनलॉक करता आला नाही म्हणून त्याने फेकून दिला.

पोलिसांनी सांगितलं की इम्रानवर यापूर्वी तिलक नगर पोलीस ठाण्यात दोन केस दाखल आहेत. यात २०१८ च्या केसमध्ये त्याच्यावर पोक्सो कलमाअंतर्गत स्टॉकिंग, अन् हल्ला करण्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT