Jalna Crime News : नागेवाडी परिसरात युवकाचा खून

जिल्ह्यात खुनाची मालिका थांबता थांबेना, एकास चंदनझिरा पोलिसांनी घेतले ताब्यात
Jalna Crime News
Jalna Crime News : नागेवाडी परिसरात युवकाचा खूनfile photo
Published on
Updated on

Youth murdered in Nagewadi area

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना मयत शहरालगत असलेल्या नागेवाडी परिसरातील झिरो पॉइंटजवळील निखील परमेश्वर पवार (२४) या युवकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची घटना मंगळवार (२५) रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

Jalna Crime News
Government Hospitals : सर्व शासकीय रुग्णालयांचे तातडीने फायर, इलेक्ट्रिकल ऑडिट करावे

निखील पवार एका हॉटेलमधे जालना शहरातील झिरो पॉइंटजवळील एका हॉटेलमधे निखील पवार बसलेला असतांना तेथे संतोष ऊर्फ पिंट्या लांडे यांच्यासह चौघेजण चार चाकी वाहनातून आले. यावेळी त्यांनी माझ्या मेलेल्या भाचीची बदनामी का करतो असे म्हणत निखिल याच्यावर धारदार चाकूने हल्ला करून त्यालला ठार मारले. घटनेनंतर चौघेजण काळ्या स्कॉर्पिओमधून घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण बिडवे, पोलिस उपनिरीक्षक एम. बी. स्कॉट, कृष्णा तंगे यांच्यासह चंदनझिरा पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चंदनझिरा पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून इतर आरोर्पीच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

Jalna Crime News
Jalna Agriculture News : पिंपळगाव रेणुकाई परिसरात सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव

या प्रकरणी मयत निखिलचा भाऊ श्याम पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष उर्फ पिंट्या लांडे, अर्जुन लांडे, सतीश आणि सोनू एखंडे यांच्यासह चौघाजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चंदनझिरा पोलिस ठाण्याच्यावतीने करण्यात येत आहे. खुनाच्या या घटनेमुळे नागेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news