Nahsik Crime News | गणपती वर्गणीचा वाद ठरला प्राणघातक! सुरगाण्यातील 29 वर्षीय तरुणाची सापुताऱ्यात हत्या

Nahsik Crime News | गणपती वर्गणीचा वाद ठरला खुनाचे कारण
Dahanu News
Dahanu NewsPudhari
Published on
Updated on

बोरगाव : पुढारी वृत्तसेवा
गुजरातधून सापुतारा येथे मागील वर्षी गणपती वर्गणीच्या कारणावरून झालेल्या वादातून हेमंत सूर्यवंशी (२९, रा. होळी चौक, सुरगाणा) या युवकाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. या प्रकरणी कुणाल किरण परदेशी (रा. सुरगाणा) याच्याविरुद्ध सापुतारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dahanu News
Nashik Malnourished Children | नाशिक जिल्ह्यात 3,672 बालके कुपोषित; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्मूलनाचे कडक आदेश!

मागील वर्षी गणपती विसर्जनावेळी हेमंत व संशयित कुणाल परदेशी यांच्यात वाद झाला होता. २६ ऑगस्टला हेमंत मित्र विजय खंबाईत, माधव गवळी व राज गाडेकरसह सापुतारा येथे मान्सून फेस्टिव्हलसाठी गेला होता.

रात्री ११.३० च्या सुमारास पावभाजीच्या दुकानात गेले होते. तिथे कुणाल परदेशी व प्रदीप पवार आले. पावभाजी खाल्ल्यानंतर कुणाल व हेमंत यांच्यात मागील वर्षाच्या गणपती विसर्जनाच्या वादासह या वर्षीच्या गणपती वर्गणीवरून पुन्हा वाद झाला. यातच कुणालने तीक्ष्ण हत्याराने हेमंतच्या पोटात दोन, तर छातीत एक वार केला. हेमंतला त्याच्या मित्रांनी दुचाकीवरून बोरगावच्या सरकारी दवाखान्यात आणले.

Dahanu News
ICU NICU Safety Audit | अमरावती दुर्घटनेनंतर नाशिक प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; सर्व रुग्णालयांना फायर अन् इलेक्ट्रिकल ऑडिटचे आदेश!

प्राथमिक उपचारानंतर त्याला वणीत सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. २७ ऑगस्टला रात्री १ च्या सुमारास हेमंतचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे सुरगाणा परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुणाल किरण परदेशी याच्याविरुद्ध सापुतारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

संशयित कळवण पोलिसांत हजर (चौकट)

घटनेनंतर कुणाल दुचाकीवरून पसार होत कळवण पोलिस ठाण्यात हजर झाला. याची माहिती कळवण पोलिसांनी सापुतारा पोलिसांना दिल्याने त्यास ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news