पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून न्यायाधीशांवर अनेक प्रकरणांमध्ये टीका केली जात होती. आज सर्वोच्च न्यायालयाने यावर चिंता व्यक्त केली आहे. न्यायाधीशांवर आरोप करण्याची सध्या फॅशन सुरू झाली आहे. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशमध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. न्यायाधीश जेवढ्या योग्य पद्धतीने काम करतील तेवढेचं त्यांच्यावर आरोप होत राहतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. (Supreme Court)
मद्रास उच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी एका वकीलाला १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली होती. मद्रास उच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने कायम ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डीवाई चंद्रचूड म्हणाले आहेत की, संपूर्ण देशातून असे प्रकार समोर येत आहेत. न्यायाधीशांवर हल्ले होत आहेत. वकील कायद्यापेक्षा मोठे नाहीत. (Supreme Court)
काही उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांना धमकवण्याची पद्धत रूढ झाली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने वकीलाला १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुन्यावल्यानंतर वकीलांनी मी बिनशर्त माफी मागितली असल्याचे म्हटले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मद्रास उच्च न्यायालयाने सुनावलेली १४ दिवसांची शिक्षा कायम ठेवली आहे. (Supreme Court)