पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर सध्या एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ आफ्रिकन प्राणीसंग्रहालयातील आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती सिंहाची थट्टा करताना दिसत आहे. मात्र, ही थट्टा त्या व्यक्तीला चांगलीच महागात पडल्याचेही आपल्याला पहायला मिळेल.
हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ जमैकाच्या प्राणीसंग्रहालयातील आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून ही व्यक्ती येथे फिरण्यासाठी आली असावी असे वाटते. यादरम्यान तो सिंहाच्या पिंजऱ्याजवळ उभा राहतो. पिंजऱ्याच्या आतून सिंहही त्याच्याकडे पाहत असतो. आत्तापर्यंत सर्व काही ठीक चालल्याचे दिसते, पण अचानक त्या व्यक्ती त्याचे बोट गमावल्याचा फटका सहन करावा लागतो.
सिंहाच्या अगदी जवळ जाऊनही त्या उद्धट माणसाचे समाधान झाले नाही. यानंतर तो पिंजऱ्यात हात घालतो आणि सिंहाचे केस ओढू लागतो. काही काळ सिंह त्याच्याच्या कृतीकडे दुर्लक्ष करतो, पण जेव्हा बराच वेळ होऊनही ती व्यक्ती आपल्या कृत्यांपासून परावृत्त होत नाही, तेव्हा सिंह चिडतो आणि त्या उद्धट जन्माची अद्दल शिकवतो.
उद्धट माणूस आपले केस उगाचच ओढून त्रास देत असल्याचे सहन न झाल्याने तो सिंह संतापतो आणि त्या माणसाच्या हाताच्या बोटाचा चावा हेतो. सिंहाच्या या अनपेक्षित हल्ल्यानंतर वेदनेने ओरडत आपले बोट सिंहाच्या जबड्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतो. अखेर मोठ्या कष्टाने तो आपले बोट मोकळे करून घेतो. पण फक्त बोटाचे हाड उरले दिसते. बोटावरचे मांस आणि कातडी सिंहाने फस्त केल्याचे पहायला मिळते.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स आपली प्रतिक्रिया देत आहेत. बहुतेक युजर्सनी म्हटलंय की त्या व्यक्तीला त्याच्या मूर्ख कृत्याबद्दल शिक्षा झाली आहे, तर बरेच युजर्स अशा लोकांवर टीका देखील करत आहेत जे त्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी त्याच्या वेदना कॅमेऱ्यात कैद करत होते. वन्य प्राणी हे तुमचे पाळीव प्राणी नाहीत, ज्यांना तुम्ही मिठी मारून प्रेम करावे, अशा आशयाची प्रतिक्रियाही अनेक युजर्सनी दिली आहे.