नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : दिल्लीतील वसंत विहार परिसरात आई आणि दोन मुलींनी आत्महत्या (suicide in delhi) केली. आत्महत्या करण्यासाठी त्यांनी घरात विषारी वायू सोडला होता. सुसाईड नोटमध्ये घरात प्रवेश करताना पोलिसांनी काय काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती आई आणि दोन मुलींनी लिहिली होती. या घटनेमुळे दिल्ली परिसरात खळबळ माजली आहे. मंजू (आई), अंशिता आणि अंशिका (मुली) अशी मृतांची नावे आहेत. एकापेक्षा जास्त सुसाईड नोट्स ठेवत त्यांनी त्यांच्या आर्थिक आणि बिघडलेल्या मानसिक स्थितीची माहिती दिली आहे.
(suicide in delhi) एका सुसाईड नोटमध्ये पोलिसांनी घरात प्रवेश करताना काय काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे. "आम्ही फ्लॅटमध्ये कार्बन मोनॉक्साईड सोडला आहे. हा गॅस अत्यंत विषारी आहे. त्यामुळे घरात येताच दरवाजे आणि खिडक्या उघडा, तसेच हा गॅस श्वसनावाटे शरीरात जाणार नाही, याची काळजी घ्या. हा गॅस ज्वलनशील आहे, त्यामुळे आगपेटीचा वापर करू नका. आभारी आहोत," असे या नोटमध्ये म्हटलेले आहे. तर दुसऱ्या एका सुसाईडमध्ये गेले एक वर्ष आम्ही आत्महत्येचा विचार करत आहोत, पण ते शक्य झाले नाही, असे नमूद केले आहे.
दरम्यान, मंजूच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते, त्यानंतर त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचलंत का ?