फळभाजी विक्रेत्‍याच्या पाेराने भारतीय क्रिकेट संघात मिळवले स्‍थान… उमरानचा प्रेरणादायी प्रवास

फळभाजी विक्रेत्‍याच्या पाेराने भारतीय क्रिकेट संघात मिळवले स्‍थान… उमरानचा प्रेरणादायी प्रवास
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑ्नलाईन डेस्क : जम्‍मू-काश्‍मीर राज्‍याचे नाव उच्‍चारलं तरी दहशतवादी हल्‍ले, निष्‍पाप नागरिकांचे बळी आणि कायमस्‍वरुपी तणाव असे चित्र आपल्‍यासमाेर उभे राहते. या राज्‍यातील भाजीपाला विक्रेत्‍याचा मुलगा क्रिकेट खेळण्‍याचे स्‍वप्‍न पाहताे. त्‍याला लाभलेली नैसर्गिक प्रतिभा आणि कठाेर मेहनतीच्‍या जाेरावर अल्‍पवधी भारतीय संघात आपलं स्‍थान निर्माण करताे, हे सारं स्‍वप्‍नवत आहे. मात्र मागील काही महिन्‍यात क्रिकेटपटू उमरान मलिक हे स्‍वप्‍न जगला आहे. जाणून घेवूया त्‍याच्‍या खडतर आणि प्रेरणादायी प्रवासाविषयी…

 १७ व्‍या वर्षापर्यंत लेदर बॉल पाहिलाच नव्‍हता

मलिक उमरानचा जन्म २२ नोव्हेंबर १९९९ रोजी श्रीनगर येथे झाला. उमरानचे वडील अब्दुल मलिक यांचे भाजीपाल्याचे दुकान आहे. उमरानने गुजर नगर येथील काँक्रीटच्या खेळपट्टीवरून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १७ व्या वर्षापर्यंत कोणतेही विशेष असे प्रशिक्षण मिळाले नव्‍हते. ताे  लेदर बॉलने क्रिकेट खेळलाच नव्‍हता. जम्मू येथे अंडर-19 चाचणीसाठी त्याची सर्वप्रथम निवड झाली. यानंतर त्याची जम्मू-काश्मीर संघात निवड झाली. त्याला जम्मू-काश्मीरमधील अनुभवी प्रशिक्षक परवेझ रसूल आणि इरफान पठाण यांनी माेलाचे सहकार्य लाभले. परवेझ रसूल म्हणतात, 'आमचे ज्युनियर खेळाडू उमरान मलिकच्या गोलंदाजीला घाबरत होते.'

गोलंदाजीच्‍या व्‍हिडीओमुळे मिळाली आयपीएल खेळण्‍याची संधी

18 जानेवारी 2021 रोजी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्‍याने पदार्पण केले.  त्यानंतर २०२१ च्या आयपीएल सीजनमध्ये टी. नटराजनच्या दुखापतीनंतर उमरानचा सनरायझर्स संघात समावेश करण्यात आला. तेव्हा देखिल उमरानच्या सामील होण्याची कहाणी खूपच रंजक आहे. अब्दुल समदने उमरानच्या गोलंदाजीचा व्हिडीओ व्हीव्हीएस लक्ष्मण आणि टॉम मूडी यांना पाठवले होते. सनरायझर्सना त्याचे व्हिडिओ आवडले. त्यानंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला.

सनरायझर्स हैदराबाद संघात पदार्पण केल्यानंतर ३ ऑक्टोबरला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्‍या सामन्‍यात त्‍याला आयपीएलमध्‍ये खेळण्याची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात त्‍याची वेगवान गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित  केले. मलिकने आयपीएलमध्ये भारतीय खेळाडू म्हणून सर्वात वेगवान चेंडू टाकला. तेव्हा हैदराबादचा संघ सामना हरला असला तरी उमरानच्या वेगवान चेंडूंनी सर्वांचीच मनं जिंकली होती.

हंगामात सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज

२२ वर्षीय उमरान हा आयपीएल 2022च्‍या हंगामात सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील शेवटच्या षटकात उमरान मलिकने 157 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. त्‍याने 14 सामन्यात 22 विकेट घेत आश्चर्यकारक कामगिरी आपल्‍या नावावर केली.

क्रिकेट हेचे हेच व्यसन

उमरानचे वडील अब्दुल मलिक यांनी एका मुलाखतीत सांगितले की 'हे वय कसे असते हे आम्हाला माहीतच आहे. अमली पदार्थांचे सेवन करून आपले आयुष्य उद्ध्वस्त करणारे अनेक तरुण आहेत. मात्र उमरानने आपल्याला फक्त क्रिकेटचे व्यसन असल्याचे सांगितले होते. पण तो खरंच खेळतोय की नाही हे कधी कधी चोरून पाहत होतो असेही त्यांनी सांगितले होते. उमरानचा अ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरचा हा वेगवान गोलंदाज आता आंतरराष्‍ट्रीय सामन्‍यात आपली छाप पाडण्‍यासाठी सज्‍ज झाला आहे.

हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news