Chinese Man Detained pudhari photo
राष्ट्रीय

Chinese Man Detained: मोठी बातमी! जम्मू काश्मीरमधून चिनी नागरिकाला अटक; भारतीय सीमकार्ड अन् सर्च हिस्ट्रीमध्ये आर्टिकल ३७०...

Anirudha Sankpal

Chinese Man Detained: जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये चीनच्या एका नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या व्यक्तीवर व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अटक केलेल्या व्यक्तीनं लडाख आणि काश्मीरमधील काही संवेदनशील आणि रणनैतिक दृष्टीनं महत्वाच्या ठिकाणी विनापरवाना भेटी दिल्याचा दावा तपास यंत्रणांनी केली आहे. आता त्याचा मोबाईल हा फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला असून त्याने संवेदनशील माहिती उघड केली आहे का हे तपासण्यात येणार आहे.

संवेदनशील भागांना भेटी

हू काँगतै असं या चीनच्या नागरिकाचं नाव असून तो १९ नोव्हेंबर रोजी प्रवासी व्हिसावर नवी दिल्ली इथं दाखल झाला होता. त्यानं लेह, झान्स्कार आणि काश्मीरमधील विविध ठिकाणच्या संवेदनशील अन् प्रतिबंधित भागांना भेटी दिल्या आहेत. यासाठी त्याने फॉरेनर रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसर (FRRO) कडे नोंदणी केली नव्हती.

२९ वर्षाचा हू झान्स्कार इथं तीन दिवस राहिला होता. त्यानं मॉनेस्ट्री आणि रणनैतिक दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या ठिकाणांना भेटी दिल्या होत्या. मात्र व्हिसानुसार त्याला फक्त ठराविक बुद्धीस्ट डेस्टिनेशनला भेटी देण्याचीच परवानगी होती. त्याला वाराणसी, आग्रा, नवी दिल्ली, जयपूर, सारनाथ, गया आणि कुशीनगर इथंच जाण्याची परवानगी होती.

खुल्या बाजारातून भारतीय सीम कार्ड

हूने दक्षिण काश्मीरमधील अनेक बुद्धीस्ट मॉनिस्ट्रींना भेटी दिल्या. तो संवेदनशील ठिकाणी गेला होता. ही ठिकाणे लष्कराच्या व्हिक्टर फोर्स मुख्यालय, हजरतबल दर्गा, शंकराचार्य हील, दल लेक आणि मुगल गार्डनच्या जवळ होती.

भारतात आल्यानंतर हूने खुल्या बाजारातून भारतीय सीम कार्ड मिळवलं. त्यानंतरच त्याच्यावरचा संशय अजून वाढला. त्याने आपल्या मोबाईलमध्ये सीआरपीएस डेव्हलपमेंट, आर्टिकल ३७० रद्द अशा प्रकारचे सर्च केले होते. तापस यंत्रणा हूने त्याची सर्च हिस्ट्री डिलीट केली आहे का हे देखील तपासत आहेत.

बॉस्टन विद्यापीठाचा विद्यार्थी?

तपासादरम्यान, हू व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबाबत निष्काळजी असल्याचे दाखवत होता. मात्र तपास यंत्रणांनी त्याच्या संशयास्पद हालचालींची कसून चौकशी सुरू केली. दरम्यान, त्यानं तपास यंत्रणांना तो बॉस्टन विद्यापीठात फिजिक्स शिकत असल्याचं सांगितलं. तो गेल्या ९ वर्षापासून अमेरिकेत असल्याचा दावा करत आहे. त्याने आपण प्रवासी असल्याचा दावा केला असून त्यानं अमेरिका, न्यूझीलंड, ब्राझील, फिजी आणि हाँगकाँगला भेट दिल्याचे पासपोर्टवरून दिसून येत आहे.

हू ला बडगाम जिल्ह्यातील हुमहामा येथील पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. हे ठिकाण श्रीनगर विमानतळापासून जवळ आहे. तिथं तपास यंत्रणा त्याची कसून चौकशी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT