Anirudha Sankpal
नवा स्मार्टफोन खरेदी करताना आपण त्याचे फिचर आणि बाकीचे कॉन्फिग्रेशन तपासून अन् इतर फोनशी तुलना करून घेतो.
मात्र तुम्ही जशी औषधे किंवा इतर गोष्टींची एक्सपायरी डेट चेक करता तशी कधी मोबाईलची एक्सपायरी डेट चेक केली आहे का?
मुळात म्हणजे मोबाईलची अशी एक्सपायरी डेट असते का... एक स्मार्ट फोन किती काळासाठी तुम्ही वापरू शकता?
स्मार्ट फोनची अधिकृत अशी एक्सपायरी डेट नसते. मात्र तुम्ही तुमचा मोबाईल किती काळ वापरायचा याचा अंदाज तुम्ही सॉफ्टवेअर अपडेटवरून ठरवू शकता.
म्हणजे एखाद्या स्मार्टफोनला किती काळ सॉफ्टवेअर अपडेट मिळातात तेवढा वेळी तुम्ही तो स्मार्टफोन वापरू शकता. त्यानंतर तो फोन एक्सपायर झाला असं मानलं जाते.
तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन एक्सपायर डेट किंवा फोनला केव्हापर्यंत सॉफ्टवेअर अपडेट मिळणार हे पाहू शकता.
विशेष म्हणजे जेव्हा फोन लाँच होतो तेव्हापासून ७ वर्षापर्यंत अपडेट मिळतात. तुम्ही फोन कधी खरेदी करता याचा त्याच्याशी काही संबंध नसतो.
आयफोनबाबत बोलायचं झालं तर याचे ५ ते ७ वर्षे सॉफ्टवेअर अपडेट येतात. म्हणजे तुम्ही एक आयफोन सात वर्षे वापरू शकता.
चिनी बनावटीचे फोनसाठी ४ ते ५ वर्षेच सॉफ्टवेअर अपडेट येतात. त्यानंतर फोन वापरणं धोकादायक असू शकतं. तुमचा फोन हॅक होऊ शकतो.