Naxal Ramdher Majji: महाराष्ट्र नक्षलमुक्त...? हिडमाच्या तोडीस तोड असलेल्या नक्षलवादी रामधेर मज्जीनं घेतला मोठा निर्णय

रामधेर मज्जीवर देखील होतं १ कोटी रूपयांचे बक्षीस, महाराष्ट्रासह मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये होता कार्यरत
Naxal Ramdher Majji
Naxal Ramdher Majjipudhari photo
Published on
Updated on

Naxal Ramdher Majji Surrender: सुरक्षा दलांना आज नक्षलवादाविरूद्धच्या लढाईत एक मोठं यश प्राप्त झालं आहे. हे यश ऐतिहासिक असं म्हटलं जात आहे. कुख्यात नक्षली कमांडर तसंच सेंट्रल कमिटी मेंबर रामधेर मज्जीने आपल्या ११ साथीदारांसह सकाळी छत्तीसगडमध्ये बकरकट्टा इथं पोलिसांसमोर समर्पण केलं.

Naxal Ramdher Majji
Zelenski India Visit: भारताची कुटनैतिक चाल... पुतीन यांच्यानंतर आता झेलेन्स्की देखील येणार भारत दौऱ्यावर?

रामधेर मज्जी हा कुख्यात नक्षली हिडमाच्या तोडीस तोड मानला जात होता. त्याच्या डोक्यावर १ कोटी रूपयाचे बक्षीस होते. त्याने आपल्या साथीदारांसह आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. यामुळं महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही राज्ये एकप्रकारे नक्षलमुक्त झाली आहेत. या क्षेत्रामध्ये नक्षलवादाविरोधातील मोहीमेचा हा एक निर्णायक विजय आहे.

Naxal Ramdher Majji
Hyderabad Road Name After Trump: हैदराबाद मधील रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव... हैदराबादचे नाव भाग्यनगर करा, भाजपची मागणी

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची यादी

  • रामधर मज्जी – CCM-AK-47

  • चंदू उसेंडी – डीवीसीएम – 30 कार्बाइन

  • ललिता – डीवीसीएम

  • जानकी – डीवीसीएम – INSAS

  • प्रेम – डीवीसीएम – AK-47

  • रामसिंह दादा – ACM – .303

  • सुकेश पोट्टम – ACM – AK-47

  • लक्ष्मी – पीएम– INSAS

  • शीला – पीएम– INSAS

  • सागर – पीएम– SLR

  • कविता – पीएम– .303

  • योगिता – पीएम–

काही दिवसांपूर्वीच हिडमाला सुरक्षा दलांनी चकमकीत ठार केलं होतं. माडवी हिडमा बस्तरच्या भागातील एक कुख्यात नक्षलवादी कमांडर होता. तो सीपीआय माओवादी गटाचा केंद्रीय कमिटीचा सर्वात युवा सदस्य होता. तो PLGA बटालियन-1 एक प्रमुख सदस्य देखील होता.

त्याने २०१० मध्ये ताडमेटला हल्ला, २०१३ चा झीरम घाटी हत्याकांड तसेच २६ मोठ्या हल्ल्याचा तो मास्टर माईंड होता. त्याच्यावर १ कोटी रूपयांचे इनाम देखील होते.

Naxal Ramdher Majji
End of Naxalite movement | बसवा राजू गेला, हिडमा मारला; आता नंबर गणपती, तिरुपतीचा

गेल्या महिन्यात १८ नोव्हेंबरला आंध्र प्रदेशच्या अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील मारेदुमिल्ली जंगलात सुरक्षा दलांनी एका चकमकीत त्याचा एन्काऊंटर केला. या चकमकीत हिडमाची पत्नी राजे सह एकूण सहा नक्षली ठार झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news