Crime News pudhari
राष्ट्रीय

Crime News: ६७ वर्षाच्या दुकानदाराचा MBA विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; गप्प राहण्यासाठी महिन्याला 'मोफत किराणा'चं अमिष

Anirudha Sankpal

Crime News 67 year old grocery shopkeeper arrested: रविवारी ६७ वर्षाच्या एका किराणा दुकानदाराला एका एमबीए विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हा दुकानदार छत्तीसगडमध्ये भाड्याने राहणाऱ्या त्या एमबीएमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या घरी शुक्रवारी किराणा पोहचवण्यासाठी गेला होता. त्यावेळी संधी मिळताच आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या बाहेर आरोपी एक छोटे किराणा दुकान चालवतो. त्याने पीडित विद्यार्थीनीच्या घरी किराणा सामान पोहचवण्याच्या बहाण्याने गेला. अवघ्या २० वर्षाची विद्यार्थिनी रूममध्ये एकटीच होती. तिची रूममेट ही बाहेर गेली होती. त्यावेळी दुकानदाराने या विद्यार्थिनीवर दुष्कर्म केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने या प्रकरणी जामीन मिळावा अशी याचिका केली होती. मात्र त्याची ही मागणी फेटाळून लावत न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पीडित नेहमी त्याच दुकानातून घेत होती सामान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनी ही या दुकानात सामान घेण्यासाठी नेहमी जात होती. ती आरोपीला ओळखत होती. शुक्रवारी सांयकाळी पीडित मुलीने काही किराणा सामानाची मागणी केली होती. त्यावेळी दुकानदाराने हे सामना सध्या संपलं आहे मात्र जवळच्या मार्केटमधून ते आणून तुम्हाला घरी पोहोच करतो असं सांगितलं.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'जवळपास रात्री ९.३० वाजता आरोपी दुकानदार पीडित विद्यार्थिनीच्या रूमवर पोहोचला. तिथे ती एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्याकडे पाणी मागितले आणि सामान तिच्याकडे दिले. ज्यावेळी मुलगी पाणी आणण्यासाठी आत गेली त्यावेळी त्या ६७ वर्षाच्या दुकानदाराने दरवाजाला आतून कडी लावली आणि पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

महिन्याला मोफत किराणा देण्याचे अमिष

यानंतर आरोपीने पीडितेला जर पोलीसांना याबाबत सांगितलस तर त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी देखील दिली. त्याचबरोबर दुकानदाराने त्या पीडितेला प्रत्येक महिन्याचा किराणा तुला मोफत देतो असं अमिष देखील दाखवलं.

जबर मानसिक धक्क्यात असलेल्या पीडित मुलीने नंतर तिची रूममेट आल्यावर घडला प्रकार सांगितलं. त्यानंतर त्या रूममेटने आपल्या घरमालकाला घडला प्रकार सांगितला. यानंतर पीडितेने शनिवारी पोलीसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सांगितलं की, 'आम्ही आरोपीला प्रथम दर्शनी पुराव्याच्या आधारे अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ६४(१) अंतर्गत बलात्कार आणि कलम ६२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.'

पीडितेला पूर्ण संरक्षण देण्याचे आश्वासन

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की पीडितेला पूर्ण संरक्षण आणि पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले गेले आहे. मात्र या प्रकरणामुळं या भागात महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या शहरात २०२४ मध्ये १४९ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते. मात्र २०२६ मध्ये यात वाढ होऊन ते १७० झाले आहेत. पोलिसांनी दावा केला आहे की यापैकी ९ गुन्हे हे चुकीचे असल्याचे आढळून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT