Crime News: '५ मिनिटांत येते' म्हणाली अन्...; १० वीच्या विद्यार्थिनीची निर्घृण हत्या, आरोपीचाही संशयास्पद अंत!

दिल्लीतील सीमापुरी परिसरात शुक्रवारी एका १५ वर्षीय मुलीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर, शनिवारी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

Crime News

नवी दिल्ली: दिल्लीतील सीमापुरी परिसरात शुक्रवारी एका १५ वर्षीय मुलीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर, शनिवारी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यातील २४ वर्षीय मुख्य आरोपीचाही शुक्रवारी संध्याकाळी त्याच्या राहत्या घरी झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटात मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेली मुलगी नुकतीच दहावीची परीक्षा देऊन निकालाची वाट पाहत होती. शुक्रवारी संध्याकाळी 'पाच मिनिटांत येते' असे सांगून ती जवळच्या दुकानात औषधे आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, तिथेच तिच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

Crime News
Shocking Train Incident |भयंकर... पोटच्‍या मुलीला आईने रेल्‍वेसमोर ढकलले, 'तिला वाचवू नका' म्हणत मदत करणार्‍यांनीही रोखले!

मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना सुमारे २० मिनिटे तिला कोणतीही मदत मिळाली नाही, असा आरोप तिच्या काकांनी केला आहे. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. "ती ५ मिनिटांत येते म्हणाली होती, पण अद्याप परतलीच नाही," असे सांगत तिच्या आजीने टाहो फोडला.

आरोपीची आत्महत्या की अपघात?

मुलीवर हल्ला केल्यानंतर काही तासांतच, दोन किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या २४ वर्षीय आरोपीचा त्याच्या घरी गॅस सिलिंडरच्या स्फोटात मृत्यू झाला. नातेवाईकांच्या मते, त्याने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने स्वतःच हा स्फोट घडवून आणला. हा तरुण एका ई-कॉमर्स कंपनीत डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता.

पोलीस तपासात नवीन माहिती समोर

सुरुवातीला दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना ओळखत नसल्याचा दावा केला होता. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे होते आणि ही बाब दोन्ही कुटुंबांना माहित होती. हल्ल्यापूर्वी त्यांच्यात फोनवर संभाषण झाले होते. दोन वर्षांपूर्वी आरोपीची मावशी मुलीच्या घराशेजारी राहत होती, तेव्हापासून त्यांची ओळख होती.

Crime News
Crime News: आईने पोटच्या ३ मुलांना नवीन कपडे-गॉगल घालून शेवटचं नटवलं आणि मग..; एकाच कुटुंबातील ५ जणांचा करुण अंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news