Crime News : विद्यार्थिनीकडे अश्लील मागणी करत छेडणारा गजाआड

नकार दिला तर बरबाद करण्याची धमकी; त्रिमूर्ती चौकातील प्रकार
sambhajinagar crime news
विद्यार्थिनीकडे अश्लील मागणी करत छेडणारा गजाआडfile photo
Published on
Updated on

Man arrested for harassing female student and making obscene demands

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुकानात सामान आणण्यासाठी जाणाऱ्या एका विद्यार्थिनीचा पाठलाग करत सराईत गुन्हेगाराने तिची छेड काढली. तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, अशी निर्लज्ज मागणी करत आरोपीने तिला नकार दिला तर बरबाद करेल, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी त्वरित कारवाई करत मंगेश रमेश बावस्कर (२५, रा. न्यायनगर) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या.

sambhajinagar crime news
MD drugs seizure : मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

पीडित विद्यार्थिनी मंगळवारी (दि.७) रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास त्रिमूर्ती चौकातील कलावती ज्वेलर्सजवळून पायी जात होती. यावेळी मंगेश बावस्करने तिचा पाठलाग सुरू केला. भररस्त्यात तिला अडवून त्याने अश्लील मागणी केली. तू मला खूप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, असे म्हणत त्याने पीडितेचा रस्ता अडवला.

पीडितेने या कृत्याला ठाम विरोध केला. भरवस्तीत हा प्रकार सुरू असताना, आरोपीने पीडितेचा उजवा हात पकडून तिला स्वतःकडे ओढले आणि विनयभंग केला. या अनपेक्षित प्रकारामुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरली होती. मात्र, तिने हिंमत दाखवत पोलिसात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी गंभीर दखल घेत पथकाला सूचना दिल्या.

sambhajinagar crime news
Chhatrapati Sambhajinagar Crime : अंधा फिरोजच्या भावासह एकाला बेड्या

आरोपी मंगेश बावस्कर याला न्यायनगर परिसरातून लागलीच ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तुझे शिक्षण थांबवून टाकेन पीडितेने विरोध करताच आर- ोपीची मुजोरी आणखी वाढली. त्याने पीडितेला धमकावत म्हटले की, जर तू मला नकार दिलास, तर मी तुला बरबाद करेन. तुझ्या रूमसमोर येऊन तमाशा करेन आणि तुझे शिक्षण थांबवून टाकेन. इतकेच नव्हे तर पीडिता दुसऱ्या कोणत्याही मुलाशी बोलली तर तिच्यासह त्या मुलालाही जिवे मारण्याची भयंकर धमकी त्याने दिली.

यापूर्वी पोस्कोच्या गुन्ह्यात जेलवारी

बावस्कर हा सराईत असून २०२३ साली त्याच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात पोक्सोचा एक गुन्हा दाखल आहे. तो अनेक महिने हर्सल जेलमध्ये राहून काही दिवसांपूर्वीच बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा तरुणींना रस्त्यात गाठून अश्लील मागणी करत छेडछाड सुरू केल्याचे समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news