shocking crime news | पोटच्या जुळ्या मुलींचा गळा चिरला आणि थेट फोन केला...नराधम बापाच्या 'त्या' कॉलने पोलीसही हादरले!

shocking crime news | उत्तर प्रदेशधील कानपूरमध्‍ये समाजमन सुन्‍न करणारी घटना समोर
shocking crime news | पोटच्या जुळ्या मुलींचा गळा चिरला आणि थेट फोन केला...नराधम बापाच्या 'त्या' कॉलने पोलीसही हादरले!
Published on
Updated on

shocking crime news

कानपूर : येथे समाज मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका बापाने आपल्याच ११ वर्षांच्या दोन जुळ्या मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. धक्‍कादायक म्‍हणचे आपल्‍या मुलींना संपविल्‍यानंतर आरोपीने स्वतः पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली. शशी रंजन मिश्रा (वय ४८) असे आरोपीचे नाव असून तो पेशाने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (MR) आहे.

दारूचे व्यसन आणि छळ : पत्नीचे गंभीर आरोप

रविवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांना या हत्येची माहिती मिळाली. आरोपी शशी रंजन मिश्राच्या पत्नी रेश्मा छेत्री हिने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, तिचा पती दारूच्या आहारी गेला होता. तो तिला नियमितपणे मारहाण करायचा, तसेच तिला जेवणापासूनही वंचित ठेवायचा.

shocking crime news | पोटच्या जुळ्या मुलींचा गळा चिरला आणि थेट फोन केला...नराधम बापाच्या 'त्या' कॉलने पोलीसही हादरले!
Gadchiroli Crime | आरमोरीत थरार: क्षुल्लक कारणावरून पोटच्या मुलाने केला पित्याचा खून

प्रेमविवाह... जुळ्या मुली आणि मानसिक छळ

दाम्‍पत्‍याचा २०१४ मध्‍ये प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्‍नानंतर काही काळातच त्यांच्या नात्यात दुरावा आला. रेश्माच्या दाव्यानुसार, तिच्या पतीने घराच्या कानाकोपऱ्यात, अगदी स्वतःच्या खोलीतही सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावले होते. ती आपल्या माहेरी जाण्याचा प्रयत्न करायची, तेव्हा तिला मारहाण केली जात असे. पतीने तिला मुलाला सोबत घेऊन घर सोडून जाण्यास सांगितले होते; पण मुलींना आपल्याकडेच ठेवण्याचा आग्रह धरला होता.

shocking crime news | पोटच्या जुळ्या मुलींचा गळा चिरला आणि थेट फोन केला...नराधम बापाच्या 'त्या' कॉलने पोलीसही हादरले!
Crime News: आईने पोटच्या ३ मुलांना नवीन कपडे-गॉगल घालून शेवटचं नटवलं आणि मग..; एकाच कुटुंबातील ५ जणांचा करुण अंत

मुलींसाठी माहेरून परतली होती पत्नी

रेश्मा म्हणाली की, पतीच्या जाचाला कंटाळून ती आपल्या मुलासह माहेरी राहायला गेली होती. पतीने मुलींना नेण्यास नकार दिल्यामुळे तिला मुलींना मागे सोडावे लागले होते. मात्र, मुलींशिवाय राहणे कठीण झाल्याने नऊ महिन्यांनंतर ती पुन्हा परतली होती. तिला पतीच्या खोलीत प्रवेश निषिद्ध होता. तो वारंवार स्वतःला आणि मुलींना मारून टाकण्याची धमकी द्यायचा.हत्येच्या रात्री

shocking crime news | पोटच्या जुळ्या मुलींचा गळा चिरला आणि थेट फोन केला...नराधम बापाच्या 'त्या' कॉलने पोलीसही हादरले!
Crime News: कसाई बाप! धावत्या रेल्वेत बापाने ६ वर्षांच्या लेकीची कोयत्याने मान कापली; शिर केले धडावेगळे

नक्की काय घडले?

घटनेच्या रात्रीबाबत माहिती देताना रेश्माने सांगितले की, "शनिवारी रात्री सर्व काही सामान्य होते. आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केले आणि त्यानंतर पती मुलींना घेऊन त्याच्या खोलीत झोपायला गेला. सीसीटीव्ही फीडमध्ये मी पाहिले की तो बराच वेळ फोनवर बोलत होता. पहाटे २:३० च्या सुमारास त्याने एका मुलीला बाथरूममध्ये नेले आणि काही वेळाने तो खोलीत परतला. त्यानंतर त्याने खोलीचे दिवे बंद केले. त्यानंतर कोणताही आवाज न आल्याने मला वाटले की सर्वजण झोपले आहेत. माझ्या मुलींची हत्या कधी झाली, हे मला समजलेच नाही."

shocking crime news | पोटच्या जुळ्या मुलींचा गळा चिरला आणि थेट फोन केला...नराधम बापाच्या 'त्या' कॉलने पोलीसही हादरले!
Crime news |१८ मुलांचा बाप, २ बायका अन् तिसरीशी प्रेमसंबंध; अनैतिक संबंधातून माजी सरपंचाचा निर्घृण खून

आरोपी पित्‍याला घटनास्‍थळावरुनच अटक

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीमलाही पुरावे गोळा करण्यासाठी पाचारण करण्यात आले. दोन्ही मुलींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते आणि त्यांच्या गळ्यावर खोल जखमा होत्या. वरिष्ठ पोलीस अधिकारी दीपेंद्र नाथ चौधरी यांनी सांगितले की, "आरोपी पित्याला घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली आहे. या दुहेरी हत्याकांडामागचा नेमका हेतू काय होता, याचा शोध घेण्यासाठी त्याची चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news