पिकअप जळाली,www.pudhari.news 
Latest

नाशिक : शाॅटसर्किट झाल्याने गवतासह पिकअप जळाली

गणेश सोनवणे

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

सुक्या गवताने भरलेली पिकअप शाॅटसर्किट झाल्याने जळाल्याची घटना संसरी नाका संत निवास परिसरात घडली. तर, या घटनेत प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर उडी मारल्याने वाहन चालक बचावला.  स्थानिक नागरिकांनी व अग्निशमनच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

काल गुरूवार  (दि.  16) सकाळी साडे दहा वाजे दरम्यान ही घटना घडली. गवताने भरलेली पिकअप MH15HH 8973 संसरी नाका संत निवासकडे जात असताना शाॅटसर्किट होऊन गाडीतील गवतावर थिनगी पडल्याने गाडीने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. वाहनचालकाने गाडी तशीच चालवत घरापासून दूर लांब शेतात उभी करत बाहेर उडी घेतली. गाडीला आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच धावाधाव सुरू झाली.

याबाबत स्थानिक नागरिकांनी कॅन्टाेन्मेन्ट बोर्डाच्या अग्निशमन दलास पोलिस स्टेशन व महावितरण कंपनीला माहिती देताच घटनास्थळी दाखल झाले. महावितरण कंपनीचे अधिकारी एस टी चव्हाण यांच्या सह कर्मचा-यांनी विजेची मेनलाईन बंद केली. तर कॅन्टाेन्मेन्ट बोर्डाचे आरोग्य अधिक्षक अमन गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालक जयवंत गोडसे, मनोज भालेराव, फायरमन जयदीप निसाळ, शुभम नेहे, मनोज पगारे आदींसह स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

हेही वाचा > 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT