सायन पनवेल महामार्गावर बसला आग | पुढारी

 सायन पनवेल महामार्गावर बसला आग

पनवेल; विक्रम बाबर : सायन पनवेल महामार्गावर खारघर येथील कोपरा पुलाजवळ टूर्स अँड ट्रॅव्हल्स बसला मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली. अग्नीशमन विभागाने बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

माहितीनूसार, बुधवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास मुंबई वरून  सांगोला सातारा जाणारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागली. या बसमध्ये एकूण १७ प्रवासी होते. बस सायन पनवेल महामार्ग  कोपरा पुला वरून जात असताना अचानक इंजिन मधून ठिणग्या पडू लागल्या. बसचालक याने प्रसंगावधान दाखवून बस थांबवली.  प्रवाशांना तात्काळ आपत्कालीन दरवाजा मधून बाहेर जायला सांगितले. इतक्यात बसने पेट घेतला. मात्र तो पर्यंत प्रवासी बस मधून उतल्याने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. या आगीत बस पुर्णपणे जळून खाक झाली होती . अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली आहे. आग नेमकी कशामुळे लागली ते स्षष्ट झालेले नाही.

हेही वाचा

Back to top button